व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

मुंबईत बारा सिलेंडरचा ब्लास्ट

0

मुंबई । प्रतिनिधी
मुंबईच्या ओशिवरा भागात आज मंगळवारी सकाळी लागलेल्या आगीत बारा सिलेंडरचा ब्लास्ट झाला. यामुळे परिसरातील ३० हून अधिक दुकाने खाक झाली आहे.आग मोठ्या प्रमाणात या फर्निचरच्या दुकानांमधून वाढली आहे. त्यामुळे परिसरात एकच भीतीचे वातावरण आहे.

ओशिवरा परिसरात फर्निचरचे मोठे मार्केट आहे. या मार्केटमध्ये अंधेरी पश्चिमेकडील जोगेश्वरी ओशिवरा येथील फर्निचर मार्केटला सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आग लागली. घटनेनंतर अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळाकडे रवाना झाल्या आहेत. या आगीत बारा सिलेंडरचा ब्लास्ट झाल्याचे समजते. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.