व्हॉईस ऑफ मीडियाच्या बीड जिल्हाध्यक्षपदी जालिंदर धांडे
प्रतिनिधी । बीड
व्हॉईस ऑफ मीडियाच्या बीड जिल्हाध्यक्षपदी दैनिक प्रारंभचे संपादक जालिंदर धांडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. रविवारी दुपारी या संदर्भात बीड येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांची ऑनलाईन उपस्थिती होती.
व्हॉईस ऑफ मीडिया ही संघटना पत्रकारांच्या प्रश्नावर गेल्या पाच वर्षांपासून देशभरात काम करते. मागील तीन वर्षांपासून बीड जिल्हाध्यक्ष म्हणून बालाजी मारगुडे यांनी काम पाहिले. नविन होतकरू पत्रकारांना जिल्हाध्यक्ष पदावर संधी मिळावी. पत्रकारांमध्ये सतत नविन नेतृत्व तयार व्हावे यासाठी मारगुडे यांनी जालिंदर धांडे यांचे नाव जिल्हाध्यक्षपदासाठी सुचविले होते. त्यास पत्रकार सोमनाथ खताळ, आनंद डोंगरे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर पत्रकार दिनेश लिंबेकर, सुनील यादव, अमोल मुळे, ज्ञानेश्वर वायबसे, केशव कदम, शुभम खाडे, डॉ.गणेश ढवळे, धनंजय जोगडे आदींनी धांडेंच्या नावाला सहमती दर्शविली. त्यानंतर व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी जालिंदर धांडे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड जाहीर केली. या निवडीबद्दल त्यांचे बीड जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.