व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

कॉपी करण्यासाठी मदत करणाऱ्या शिक्षक, कर्मचाऱ्यास बडतर्फ करा : मुख्यमंत्री

0

मुंबई । प्रतिनिधी
राज्यात १२ वीच्या परीक्षांचा आजपासून सुरुवात झाली आहे. या परीक्षेच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत दहावी बारावी परीक्षेत सामूहिक कॉपी करण्याचे प्रकार ज्या केंद्रावर उघडकीस येतील त्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द करा आिण जे शिक्षक आणि कर्मचारी कॉपी करण्यासाठी मदत करतील त्यांना बडतर्फ करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिले आहेत.

आजपासून इयत्ता बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. 18 मार्च पर्यंत 3,373 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. तर 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या काळात दहावीची परीक्षा होणार आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी यांच्याशी परीक्षेच्या तयारी बाबत आणि कार्यवाही करण्याबाबत संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री उपस्थित होते. परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडणे ही जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची संयुक्त जबाबदारी राहील. शहरी भागात पोलीस आयुक्त व महानगरपालिका आयुक्त यांची जबाबदारी राहील, इंग्रजी भाषा, गणित व विज्ञान विषयांच्या परीक्षे दिवशी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संवेदनशील केंद्रांना स्वत: भेटी द्याव्यात, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.