व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

बारावी परीक्षा; सांगलीत विद्यार्थ्याची आत्महत्या तर वैजापूरमध्ये अपघातात ५ विद्यार्थी जखमी

0

छत्रपती संभाजीनगर/ सांगली । प्रतिनिधी
राज्यात आजपासून बारावीच्या परीक्षांना सुुरुवात झाली आहे. राज्य सरकारकडून परीक्षेत कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत असून कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. दरम्यान मिरज येथे १२ वीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली तर परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याची घटना खंडाळ (छत्रपती संभाजीनगर) येथे घडली.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी इयत्ता बारावीची बोर्डाची परीक्षा राज्यभरात आजपासून ( 11 फेब्रुवारी ) सुरू झाली . सकाळी 11 वाजता राज्यभरातील परीक्षा केंद्रांवर बारावी बोर्डाच्या पहिल्या पेपरला सुरुवात झाली .दरम्यान परीक्षेच्या एक दिवस अगोदर सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात एका प्रथमेश बाळासाहेब बिराजदार या विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रथमेशच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. दुसरी घटना वैजापूर जवळील खंडाळा येथे घडली.12वी परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे . गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला असून 5 विद्यार्थी जखमी झाले आहेत. या पाच विद्यार्थ्यांपैकी एक तरुण गंभीर जखमी असून इतर चारही जखमी विद्यार्थी बोर्डाच्या पेपरसाठी हजर राहिले . जखमी तरुणाला तातडीने वैजापूरचा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत .

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.