नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत गडचिरोलीचा जवान शहीद
मुंबई । प्रतिनिधी
महाराष्ट्र आिण छत्तीसगडच्या सीमोवर आज नक्षलवादी आिण पोलिसांच्या झालेल्या चकमकीत गडचिरोली येथील जवान शहीद झाला असून एक जवान जखमी झाला आहे. महेश नागुलवार असे शहीद जवानाचे नाव आहे.
जिल्ह्याच्या छत्तीसगड सीमेवरील भामरागड तालुक्यातील दिरंगी आणि फुलनार गावच्या जंगल परिसरात नक्षलवाद्यांचा कॅम्प लागल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार सीआरपीएफ आणि गडचिरोली पोलिसांचे 18 सी -60 पथक मोहिमेवर होते. यामध्ये नक्षलवादी आिण पोलिसामध्ये बराच वेळ चकमक सुरू होती. चकमकीत सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने नक्षल तळ उध्वस्त केला. मात्र जवान महेश नागुलवार यांच्या पोटाला गोळी लागल्याने ते शहीद झाले. तर दुसऱ्या जवानाच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी आहेत.
गेली साडेचार वर्ष गडचिरोली पोलीस एकही कॅज्युअलटी शिवाय नक्षलवाद्यांशी लढा देत होते. मात्र आज दुर्दैवाने सी- 60चा एक जवान शहीद झाला आहे.