व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

सुदर्शन घुलेला दोन दिवसांची पोलिस कोठडी

0

बीड । प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले दोन दिवसांची पोलिस कोठडी आज केज न्यायालयाने सुनावली आहे.

आवादा एनर्जी पवनचक्की प्रकल्प चालकाकडून दोन कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी सुदर्शन घुलेसह इतरांवर केज पाेलिसात गुन्हा दाखल होता. या प्रकरणी आज केज न्यायालयात घुले याला हजर करण्यात आले. केज न्यायालयाने खंडणी प्रकरणी त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सुदर्शन घुलेला सरपंच देशमुख हत्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. आता खंडणी प्रकरणात देखील सीआयडी कडून सुदर्शन घुलेची चौकशी केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.