व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

राजन साळवी यांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

0

मुंबई । प्रतिनिधी
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे कोकणातील बडे नेते माजी आमदार राजन साळवी यांनी आज शिवसेनेच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. उद्या गुरुवारी ते शिंदे गटात प्रवेश करतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.कोकणात ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
माजी आमदार राजन साळवी यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुर लांजा विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. साळवी यांनी नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हाप्रमुख, तीन वेळा आमदार, आता उपनेता अशा विविध पदांवर काम केले आहे. यामुळे शिवसेनेची कोकणात मोठी ताकद आहे. मात्र पक्षांतर्गत होणाऱ्या गटबाजीमुळे त्यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. दरम्यान गुरुवारी साळवी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करतील असा अंदाज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.