आ.धस पुन्हा आक्रमक; उद्या अजित पवारांची भेट घेणार
बीड । प्रतिनिधी
संतोष देशमुख हत्येनंतर परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरण आिण डीपीडीसीतील घोटाळ्या प्रकरणी आमदार सुरेश धस पुन्हा आक्रमक झाले आहेत. या प्रकरणी गुरुवारी दि.13 रोजी उपमुख्यमंत्री अिजत पवार यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी आ.धस यांनी सांगितले.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येनंतर बीड जिल्ह्यासह राज्यभरात तीव्र पडसाद उमटले. आमदार सुरेश देशमुख यांनी हे प्रकरण लावून धरल्याने तपासाला वेग आला आिण आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणी पोलिस तपास सुरु आहे. दरम्यान परळीतील महादेव मुंडे हत्याप्रकरण आणि डीपीडीसीतील घोटाळा प्रकरणावरुन सुरेश धस आक्रमक झाले आहेत. याप्रकरणी, आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन गेल्या 5 वर्षातील चौकशीची मागणी करणार असल्याचे आमदार धस यांनी सांगितले. 72 कोटींच्या घोटाळ्याची यादी मी स्वत: अजित पवारांना दिल्याचे धस यांनी म्हटले. तसेच, 2019 ते 2022-23 मधे सर्वाधिक भ्रष्टाचार झाला आहे. सध्या नियोजन विभागाने केवळ 2024 आणि 2025 ची चौकशी लावली आहे. मी उद्या अजित पवारांना विनंती करणार आहे, मागील 5 वर्षांची चौकशी करा. कारण, 25 जून 2023 पर्यंत सर्वांत जास्त बोगस बिले काढण्यात आली आहेत, असेही धस यांनी म्हटले.