सरकारला वेळ द्यावा लागणार म्हणत जरांगे पाटलांचे साखळी उपोषण तुर्त स्थगित
जालना । प्रतिनिधी–राज्य सरकारने मराठा आरक्षणप्रश्नी शिंदे समितीला मुदतवाढ दिली असून शिंदे समितीन गॅझेटचा अभ्यास केला आहे. आता याचा अभ्यास करुन सरकारला निर्णय घ्यायचा आहे. यामुळे सरकारला पंधरा दिवसांचा वेळ द्यावा लागेल असे म्हणत मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी साखळी उपोषण तुर्तास स्थगित केले आहे.
मराठ आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे यांनी १५ फेब्रुवारीपासून साखळी उपोषण सुरु करणार असल्याचे जाहिर केले होते. हे उपाेषण बेमुदत करणार असल्याचे ते म्हणाले होते. दरम्यान सरकारने शिंदे समितीला मुदवाढ दिल्यानंतर जरांगे यांनी साखळी उपोषण तुर्त मागे घेण्याचा निर्णय घ्ेतला आहे. जरांगे म्हणाले की, सातारा संस्थानचे पुरावे आिण मुंबई गॅझेट शिंदे समितीकडे आहे. गॅझेटचा अभ्यास शिंदे समितीने केला आहे. आता सरकार त्याचा अभ्यास करणार आहे असे जरांगे म्हणाले.