आ. सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची केली विचारपूस
मुंबई l प्रतिनिधी
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना काल अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर आमदार सुरेश धस यांनी आज धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
याप्रकरणी आमदार धस म्हणाले की, धनंजय मुंडे यांना रात्री उशिरा रुग्णालयात नेल्याचे मला समजले. यामुळे मी आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली व त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यात वेगळी काही चर्चा झाली नाही. केवळ तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मुंडे यांची भेट घेतल्याचे आमदार सुरेश धस म्हणाले. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित असल्याचे समजते. दरम्यान दस यांनी मुंडे यांची भेट घेणे हे दुर्दैवी असल्याचे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. असे झाले असेल तर सुरेश धस मुंडे विरोधात यापुढे लढतील का नाही याबाबत मला शंका वाटते असेही दमानिया म्हणाल्या