धस,मुंडे यांच्यात मनभेद नाही तर मतभेद, तोही दूर होईल : बावणकुळे
मुंबई । प्रतिनिधी
माणसाच्या जीवनात थोडा काळ असा असतो, काळ मतभेद दूर करतो. काही काळाने धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांचे मतभेद दूर होतील असेही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. दरम्यान मी, मुंडे आिण धस आम्ही चार साडेचार तास एकत्र होतो असेही बावणकुळे म्हणाले.
आ.धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे म्हणाले की, मी, धनंजय मुंडे आणि सुरेश धस साडेचार तास एकत्र होतो, त्यांच्यात मतभेद आहेत पण मनभेद नाहीत, दोघेही इमोशनल आहेत.दोघांमध्ये थोडे मतभेद आहेत, ते दूर होतील. मी पक्षाचा अध्यक्ष आहे, माझ्याकडे दोघेही भेटले. धनंजय मुंडेंनी भाजपच्या प्रवासासोबत माझ्यासोबत काम केलं आहे. त्यामुळे धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यातील भेट ही पारिवारीक भेट झाली आहे. आम्ही तिघेही परिवार म्हणून बसलो होतो. त्यांच्यात मतभेद आहेत,पण मनभेद नाहीत असं बावकुळे म्हणाले.