महाकुंभात पुन्हा लागली आग
प्रयागराज । वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सर्वात मोठा महाकुंभ मेळा सध्या सुरु आहे. महाकुंभात काही दिवसांपूर्वी आग लागल्याच्या दुसरी घटना घडल्या होत्या. यानंतर आज शनिवारी पुन्हा आग लागली.
प्रयागराज येथे महाकुंभ सुरु होऊन आज 28 दिवस झाले आहेत. काही दिवसांपूर्वी 19 जानेवारी नंतर 7 फेब्रुवारी रोजी महाकुंभमध्ये आग लागल्याची घटना घडली होती. ही आग सेक्टर 18 मध्ये लागली होती. यानंतर आज शनिवारी पुन्हा आग लागली. आगीत अनेक तंबू जळाले असून अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाली असून आग अटोकण्यात येत आहे. दरम्यान घटनास्थळावरुन गर्दीला हटविण्यात आले आहे.