महाकुंभ; 52 कोटी नागरिकांनी केले पवित्र स्नान
प्रयागराज । वृत्तसंस्था
प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळाव्यात 52 कोटी नागरिकांनी पवित्र संगमात स्थान करत महाकुंभमेळ्याला हजेरी लावली आहे. आजुन 11 दिवस महाकुंभमेळा सुरु राहणार आहे.
प्रयागराज येथे 13 जानेवारीपासून महाकुंभमेळा सुरु झाला. 45 दिवस चालणाऱ्या महाकुंभमेळ्याचा आज 34 वा दिवस असून दुपारी चार वाजेपर्यंत 10 कोटी नागरिकांनी संगमात स्नान केले. दरम्यान लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, कंेद्रीय मंत्री पीयूष गोयल, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, माजी मंत्री डॉ.हर्षवर्धन, केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी संगमात स्नान केले.