व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

थोडे दिवस थांबा, त्या बैठकीची सर्व माहिती मी देतो : खा.सोनवणे

0

बीड । प्रतिनिधी
आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीवरुन वादळ निर्माण झाले असताना खासदार बजरंग सोनवणे यांनी या भेटीवर मोठे विधान केले आहे. थोडे दिवस थांबा, धस आणि मुंडे यांच्या बैठकीची सर्व माहिती मी देतो असे खासदार बजरंग सोनवणे म्हणाले. एवढेच नाही तर धस आणि मुंडे यांच्या दोनदा भेटी झाल्याचा दावा खा.सोनवणे यांनी केला आहे.

आमदार सुरेश धस यांनी काही दिवसांपूर्वी प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याचे वृत्त आल्यानंतर धसांवर जोरदार टीका झाली. या प्रकरणी मुख्यमंत्री देवंेद्र फडणवीस आिण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या भेटीत गैर काय म्हणत दोघांची पाठराखण केली. यावर आता बीडचे खासदार बजरंग सोनवणे म्हणाले की, सुरेश धस यांनी बावणकुळेंसोबत दोनदा भेट झाल्याचे सांगितले. धस यांनी बावणकुळेंसोबत जेवताना मुंडेंची भेट तिथे आले असे सांगितले म्हणजे तिथे दोघांची भेट असेल. यानंतर ते पुन्हा मुंडेंच्या निवासस्थानी भेटायला गेले म्हणजे तिथेही भेट झाली अशी दोनदा दोघांची भेट असेल. मात्र या दोघांमध्ये काय चर्चा झाली. त्यांच्या बैठकीची सर्व माहिती मी सांगतो. पण ती काही दिवसानंतर सांगतो असे सोनवणे म्हणाले. दरम्यान संतोष देशमुख प्रकरण हा आमचा जिव्हाळ्याचा मुद्दा असल्याचे खा. सोनवणे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.