शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी सूचना व हरकती मागविणे
बीड । प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाद्वारा राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यासाठीचे गुणांकन प्रसिद्ध करण्यात आले असून यावर हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत.
क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणार्या ज्येष्ठ क्रीडा महर्षिकरीता जीवन गौरव पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शकांकरीता उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) व जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
शासनाने दि. २९ डिसेंबर, २०२३ व दि.२५ जानेवारी २०२४ अन्वये शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सुधारीत नियमावली, २०२३ विहीत केली आहे. या नियमावलीनुसार सन २०२३-२४ या वर्षाच्या पुरस्कारासाठी राज्यातील क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू व साहसी उपक्रमात सहभागी झालेले खेळाडू/व्यक्ती यांच्याद्वारा दि. १४ जानेवारी ते २६ जानेवारी, २०२५ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झालेल्या अर्जाची प्राथमिक छाननी करण्यात आलेली असून, प्राथमिक छाननीचे गुणांकन तक्ते शासन निर्णय क्र. शिछपु. २०२३/ प्र.क्र.१८८/क्रीयुसे-२ दि. २९ डिसेंबर, २०२३ मधील नियम क्र.१.१९, नियम क्र.१.२०, नियम क्र.१.२१ अन्वये https://shivchhtrapatiawards.com या लिंकवर एकूण गुणांकनासह दि.१५ ते १८ फेब्रुवारी, २०२5 या कालावधीसाठी सूचना व हरकतींसाठी प्रसिद्ध करण्यात येत आहेत.
प्राथमिक छाननी अहवाल हे अंतिम नसून, त्यामध्ये आपल्या सूचना व हरकतींनुसार बदल होऊ शकतो, तसेच सूचना/हरकतीनंतर सदरचा अहवाल पुनश्च प्रसिद्ध करण्यात येणार नाही.
प्राथमिक छाननी अहवालात केलेल्या पुरस्कार गुणांकनाबाबत कांही आक्षेप किंवा सूचना असतील तर त्या सोबत जोडलेल्या विहीत नमुन्यात desk14.dsys-mh@gov.in या ई-मेल आय.डी.वर सादर कराव्यात. विहीत नमूना या टिप्पणीच्या पृष्ठ क्र. २ वर दिलेला आहे.
या विहीत नमुन्यामध्ये पुरस्कारासाठी ऑनलाईन सूचना व हरकती सादर करण्याचे वेळापत्रक :
सूचना व हरकती सादर करण्याचा सुरुवातीचा दिनांक : १५ फेब्रुवारी,२०२५ सूचना व हरकती सादर करण्याचा अंतिम दिनांक १८ फेब्रुवारी, २०२५ सायं ०५.०० पर्यंत पुरस्कार गुणांकन तक्ते अवलोकनासाठी व सूचना/ हरकती सादर करण्यासाठी ऑनलाईन लिंक : https://shivchhatrapatiawards.com ही आहे. अधिक माहितीसाठी अनिकेत काळे (क्रीडा अधिकारी) ९६०४९५९६७८ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी केले आहे.