व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

शेतक-यांनी आधुनिक शेतीसाठी ट्रॅक्टर व अवजारांचा वापर करावा-आ सुरेश धस

आष्टीत स्वराज ट्रॅक्टर शोरूमचे उद्घाटन आ सुरेश धस यांच्या हस्ते तर माजी आ बाळासाहेब आजबे,माजी आ भीमराव धोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

0

आष्टी click2ashti-शेतकऱ्यांनी अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ व सबरी आणि महात्मा फुले विकास महामंडळ या योजनेचा लाभ घेऊन आपल्या शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर खरेदी करावा आणि स्वराज ट्रॅक्टर योग्य असून त्यांचा वापर योग्य पद्धतीने करावा रमेश दादा आजबे हे शेतकरी व सर्वसामान्य घटकांना सवलत नक्कीच देतील आणि त्यांचे शोरुम अनेक जिल्ह्यांत असून ते योग्य उद्योजक म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला आहे ते शेतकऱ्यांना योग्य किमतीत ट्रॅक्टर देत आहेत आणि सहकार्य करत आहेत तर शेतकऱ्यांनी शेती कामामध्ये ट्रॅक्टर व आधुनिक अवजारांचा वापर करावा असे प्रतिपादन आ सुरेश धस यांनी केले.

आष्टी-येथील पहिल्या ग्राहकांला ट्रॅक्टरची चावी देतांना मान्यवर दिसत आहेत‌.

आष्टी येथील सावळेश्वर ट्रॅक्टर्स शोरुम धोंडे पेट्रोल पंपासमोर सुरू केले असून,या शोरूमचे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभमुहूर्तावर आ सुरेश धस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.यावेळी ते बोलत होते‌.याप्रसंगी माजी आ.बाळासाहेब आजबे, माजी आ.भीमराव धोंडे,मुरलीधर आजबे,सतीश शिंदे,बद्रीनाथ जगताप,डॉ शिवाजी राऊत,काकासाहेब शिंदे,भाऊसाहेब घुले,सरपंच सुधीर पठाडे,दत्तात्रय खोटे,बबन कराडे,दादासाहेब जगताप,सुनिल सुर्यवंशी, सुभाष गणगे, सेवा निवृत्त नायब तहसीलदार गिते साहेब,पै फिरोज बागवान आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी माजी आ.बाळासाहेब आजबे व माजी आ.भीमराव धोंडे यांनी शोरुमच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.स्वराज ट्रॅक्टरचे डिलर रमेश आजबे यांनी मान्यवरांचे स्वागत केले व आभार मानले. या कार्यक्रमास सरपंच परिवत गायकवाड,सुभाष गणगे,के.के. काकडे,गणेश डोके,अकरम सय्यद,सलमान बागवान,गणेश डोके,जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे,अविनाश कदम,अक्षय विधाते,संतोष नागरगोजे,सोपान पगारे आदी शेतकरी,नागरिक,व्यापारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

 

उद्घाटनप्रसंगी बोलतांना आ.सुरेश धस दिसत आहेत.

शेतकऱ्यांनी पहिल्याच दिवशी १९ ट्रॅक्टरची केली खरेदी
आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी प्रथमच स्वराज ट्रॅक्टरचे अधिकृत डिलर सावळेश्वर ट्रॅक्टरचे डिलर रमेश दादा आजबे यांनी ग्राहकांना आकर्षक व्याजदर,आकर्षक किंमत व आकर्षक ऑफर दिल्याने सवलतीचा पहिल्याच दिवशी १९ ट्रॅक्टरची शेतकऱ्यांनी खरेदी केली.आकर्षक सवलत दिल्याने शेतकऱ्यांनी डिलर रमेश दादा आजबे यांचे आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.