व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

धस मस्साजोगमध्ये; मनोज जरांगेंची पुन्हा धसांवर टीका

0

बीड । प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुरुवातीपासून आक्रमक असलेले आमदार सुरेश धस यांनी आज मस्साजोग येथे जाऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी मस्साजोग ग्रामस्थांनी धस यांना पाठिंबा जाहिर केला. यावर मनोज जरांगे यांनी आ.धस यांचा विषय माझ्यासाठी संपला असे म्हणत पुन्हा आ.धसांवर पुन्हा टीका केली.

काही दिवसांपूर्वीच त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली होती. यानंतर सुरेश धस यांच्यावर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला होता. मनोज जरांगे तसेच मस्साजोग ग्रामस्थांनीही धस यांचा समाचार घेतला होता. दरम्यान आज आमदार धस यांनी मस्साजोग येथे देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी मस्साजोग ग्रामस्थांनी आ.धस यांना पाठिंबा दिला. यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, माझ्यासाठी तो विषय संपला आहे. त्यावर मला बोलायचं नाही. मी एवढा जीव लावला होता, समाजाने त्यांना तळ हातावर घेतलं होतं. एवढ्या क्रूर माणसाला जाऊन भेटण्याची गरज नव्हती. तुमच्यावर पक्षाचा दबाव होता तर तुम्ही सरळ सांगायला पाहिजे होतं की पक्षाने माझ्यावर दबाव आणलेला आहे. मला सांगत आहेत मॅटर दाबून टाक तू मागे सरक, सुरेश धसांनी अशी सरळ प्रेस घ्यायला पाहिजे होती. मी समाजाची गद्दारी करू शकत नाही हे धसांनी म्हणायला पाहिजे होतं. मी धनंजय मुंडे यांना भेटायला जात नाही. मी पक्षाचा आणि आमदारकीचा पण राजीनामा देत आहे, असं धस यांनी म्हणायचं होतं. धस यांच्या विषय माझ्यासाठी संपलेला आहे, अशी टीका त्यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.