व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आमची केस दाबण्याचा पोलिसांचा प्रयत्न : धनंजय देशमुख यांचा आरोप

0

बीड । प्रतिनिधी
माझा भाऊ संतोष देशमुख हत्या प्रकरण पोलिसांकडून कमकुवत करुन दाबण्याचा प्रयत्न पाेलिसांकडून केला जात आहे. आरोपींना वाचविण्यासाठी पोलिसांची खास टीम सक्रीय असल्याचा आरोप सरपंच देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करण्यात आली. यातील आरोपींना पकडण्यात आले असून कृष्णा आंधळे अजुनही फरार आहे. या घटनेला दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. या दरम्यान बऱ्याच घटना घडामोडी झाल्या. दरम्यान धनंजय देशमुख म्हणाले की, माझ्या भावाच्या हत्या प्रकरणतील आरोपी आणि पोलिसांचे लागेबंध पूर्वीपासूनच उघड झाले आहेत. या प्रकरणातील काही पोलिसांच्या बदल्या केल्या असल्या तरी ते थेट आरोपींना वाचवण्यासाठी आणि केस कमकुवत करण्यासाठी जीवाचे रान करत असल्याचा आरोप मस्साजोग ग्रामस्थांनी केला आहे. तर आरोपीला वाचवण्यासाठी पोलिसांची टीमच सक्रिय झाल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे. मस्साजोग ग्रामस्थांनी सुद्धा पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. धनंजय देशमुख यांच्या आरोपानुसार, कृष्णा आंधळेवर पोलिसांनी कारवाई केली नाही. सीआयडीकडे तपास दिल्यावर केज पोलिसांनी काहीच मदत केली नाही. आरोपीला वाचवण्यासाठी पोलिसांची टीम पुढे आली आहे. जे स्वतः आरोपी आहेत तेच आरोपीना वाचवण्यासाठी पुढे आले आहेत. 6 तारखेला ऍट्रॉसिटी दाखल केली नाही. खून झाल्यावर 12 तारखेला दाखल केली. त्यामुळे जर 6 तारखेला गुन्हा दाखल झाला असता तर ही घटना घडली नसती, असे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.