व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

दैठणामध्ये विविध कार्यक्रमाने शिवजयंती साजरी 

0
आष्टी प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील दैठणा गावामध्ये विविध कार्यक्रमाने शिवजयंती साजरी करण्यात आली. गावातील महिलांनी पाळणा म्हणून शिवजन्मोस्तव साजरा केला त्यानंतर गावातील ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले शिवजयंती उत्सव समितीतर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दैठणा शिक्षक श्री अशोक तोतरे (मुख्याध्यापक) ,सहशिक्षक श्री विकास खेडकर ,श्रीमती  काझी मॅडम यांना शाळेची जिल्हा मध्ये गुणवत्ता  टिकून ठेवल्या बद्दल  व शाळेतील चांगल्या कार्य बद्दल सन्मानचिन्ह सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला त्यानंतर शाळेतील विद्यार्थी चे भाषणे व विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले शिवजयंती उत्सव समिती , डॉ.दादासाहेब कदम ,डॉ. तुषार पवार व कदम फार्मा डिस्ट्रीबुटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले दैठणा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांना  खाऊ, वही, पेन देण्यात आले नंतर सर्व  शिवभक्तांनी दैठणा ते कडा कारखाना रॅली काढली व कडा कारखाना येथे मावळा ग्रुप ने कडा कारखाना येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान केले तसेच समस्त ग्रामस्थ दैठणा व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दैठणा यांचे कार्यक्रम उत्साहात पार पडले त्याबद्दल शिवजयंती उत्सव समितीतर्फे विशेष आभार व्यक्त करण्यात आले तसेच सर्व  शिवभक्तांनी डीजे मुक्त शिवजयंती साजरी करून एक नवीन आदर्श जनतेसमोर ठेवला
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.