तिसऱ्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीलाही धनंजय मुंडे पुन्हा गैरहजर
मुंबई I प्रतिनिधी
मोतीबिंदू शस्त्रक्रिया व नंतर बेल्स पाल्सी या आजाराने त्रस्त असलेले मंत्री धनंजय मुंडे आज सलग तिसऱ्यांदा मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहिले. दरम्यान परळी येथे पशुवैद्यकीय महाविद्यालयास मंत्रिमंडळात मंजुरी दिल्याबद्दल मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण व खंडणीप्रकरणी अटकेत असलेले वाल्मीक कराड हे मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्याने धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी देखील होत आहे. मात्र, अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडेंच्या राजीनाम्याबाबत कुठलाही ठोस निर्णय घेतला नाही. त्यातच, आधी मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि नंतर बेल्स पाल्सी आजाराने ग्रस्त असल्याने धनंजय मुंडे मंत्रिमंडळ बैठका आणि पक्षाच्या कामकाजापासून दूर असल्याचे दिसून येते. त्यातच, आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला देखील त्यांची अनुपस्थिती होती. सगल तिसऱ्या मंत्रिमंडळ बैठकीला ते प्रकृतीच्या कारणास्तव अनुपस्थित राहिले. मात्र, आजच्या बैठकीत परळीतील पशुवैद्यकीय महाविद्यालयासंदर्भाने झालेल्या निर्णयावर त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहे