पत्रकारांची कृषी सफर;फळबागेची पाहणी,पत्रकाराचा फळबागेचा यशस्वी प्रयोग !
आष्टी तालुक्यात फळबागेकडे शेतकऱ्यांचा कल
आष्टी click2ashti-तालुक्यातील काकड्याची किन्ही येथे सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांच्या पाच एकरातील १ हजार ५०० संत्रा झांडाची पाहाणी व स्नेहभोजन सोहळा आज मळ्यात झाला.यावेळी आष्टी तालुका पत्रकार संघाचे सर्वची सर्व सर्व १३ सदस्य उपस्थित होते.

महाशिवरात्रीच्या पुर्वसंध्येला हे शुध्द शाकाहारी स्नेहभोजन झाले. अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असलेल्या शेती व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणावर आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रगती होत असतानाच आष्टी तालुक्यातील विविध ठिकाणी शेतकऱ्यांनी फळबागाचा प्रयोग केला आहे.त्याला बऱ्यापैकी यश येत आहे.अशाच एका फळबागेला आष्टी तालुका पत्रकार संघाच्या सदस्यांनी आज मंगळवारी भेट दिली.शिवरात्र आजच झाली मग तुमची आष्टी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेती क्षेत्रावर पश्चिम आणि दक्षिण आणि उत्तर दिशेला आहे.शेती क्षेत्र विस्तारलेले आहे.काही ठिकाणी सिंचन सुविधा आहेत तर बऱ्याच शेती क्षेत्राला पाण्याविना कोरडवाहू पिके घेणे वाचून पर्याय नाही.अशा स्थितीमध्ये आष्टी तालुक्यातील किन्ही गावांमधील शेतीनिष्ठ शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आणि कृषी क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार फळबागांचा प्रयोग केला आहे विविध जातीची आंबे,संत्री,मोसंबी,चिंच,डाळिंब यासह अनेक फळबागा येथे फुलविण्याचे दिसून येत आहे.आज तालुक्यातील काकड्याची किन्ही येथील शेतीनिष्ठ शेतकरी दत्ताभाऊ काकडे यांच्या फळबागेला आष्टी तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज आवर्जून भेट देत पाणी व्यवस्था सिंचन सुविधा जमिनीचा पोत फळबागेत चालवलेले विविध प्रयोग आणि अधिकाऱ्यांनी केलेले मार्गदर्शन यातून फुललेली ही फळबाग त्यांनी बारीक नजरेतून पाहिली. दरम्यान शेतकऱ्यांनी हाती घेतलेल्या फळबागांना शासनाने खऱ्या अर्थाने आर्थिक पाठबळ आणि अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन दिल्यास भविष्यात ऊसतोड कामगार असलेला जिल्हा हे ओळख पुसून शेती क्षेत्रातील अध्याय निर्माण होईल असा विश्वास ज्येष्ठ पत्रकार तथा उपसंपादक उत्तम बोडखे यांनी व्यक्त केला.यावेळी आष्टी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रविण पोकळे,जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे,उत्तम बोडखे,दत्ताभाऊ काकडे,प्रा.डाॕ.विनोद ढोबळे, मराव गुरव,रघुनाथ कर्डीले,संतोष सानप,शरद तळेकर,गणेश दळवी,शरद रेडेकर,सचिन रानडे,मनोज पोकळे हे उपस्थित होते.