व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

त्या बलात्कारी आरोपीला पुणे पोलिसांनी ७० तासांत बेड्या ठोकल्या

0

पुणे click2ashti-पुणे स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.पुण्यातील शिरूर तालुक्यातील एका गावातून पुणे पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या ठोकल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील गुणाट गावातून पुणे पोलिसांनी आरोपीला मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास बेड्या ठोकल्या आहेत. तब्बल 70 तासानंतर फरार आरोपी दत्तात्रय गाडे पोलिसांच्या हाती लागला आहे.आरोपी फरार झाल्यानंतर त्याचा युद्धपातळीवर शोध सुरू होता. स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तो आपल्या गुणाट या गावी गेला असल्याचे समोर आले होते आणि तो गावातील शेतात लपवून बसला असण्याची ही शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत होती.त्या दृष्टीने पोलिसांकडून श्वान पथक बोलावून तसेच ड्रोनच्या साहाय्याने आरोपीचा शोध घेतला जात होता. त्यानंतर अथक प्रयत्न केल्यानंतर अखेर शुक्रवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास तो स्वारगेट पोलिसांच्या हाती लागला.त्यानंतर आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर शिरूर येथून रात्री तीन-सव्वातीनच्या सुमारास पुण्यातील लष्कर पोलिस स्टेशन येथे आणण्यात आले आहे.या कारवाई ने पुणे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.