व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

धनजंय मुंडे यांनी आपला मंत्री पदाचा राजीनामा मुख्यमंत्री यांच्याकडे दिला

0

मुंबई click2ashti-बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निघृण हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितले.धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे.धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा पाठवल्याचे समोर आले आहे.
देवगिरी बंगल्यावर सोमवारी रात्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार,सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांची बैठक पार पडली होती.या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांना धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे.त्यानुसार आज धनंजय मुंडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सादर केल्याचे समजत आहे.
देशमुखांची हत्या करतानचे क्रूर फोटो समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सूत्रधार वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांना निकटचा सहकारी आहे. या प्रकरणात त्यांचे नाव आल्यापासून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. मात्र, धनंजय मुंडे यांचा या प्रकरणात थेट सहभाग नाही, असे सांगत अजित पवार यांनी त्यांची पाठराखण केली होती. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय त्यांचा पक्ष घेईल, अशी भूमिका घेतली होती.मात्र,सोमवारी संतोष देशमुख यांच्या हत्या करतानचे क्रूर फोटो समोर आल्यानंतर राज्यातील वातावरण संतप्त झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.