पंकजा मुंडे इंटरनॅशनल नेत्या,त्यांना बीडचे प्रश्न विचारू नका-आमदार सुरेश धस
मुंबई click2ashti-देशमुख बंधूनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंकजा मुंडे यांच्यासाठी भाजपच्या बुथवर काम केले आहे.पंकजा मुंडे यांच्याकडून किमान आपल्या बुथप्रमुखाच्या बाबतीत असंवेदेशनली वक्तव्य होईल असं वाटले नव्हते.पंकजा मुंडे इंटरनॅशनल नेत्या आहेत.त्यांना बीड जिल्ह्याबद्दल सोयरसुतक राहिलेले नाही.इथून पुढे तुम्ही त्यांना डोनाल्ड ट्रम्प,बायडन,पुतीन,गाझा पट्टी,डेन्मार्क जर्मनी या देशांतील हवामानाचे प्रश्न विचारत जा असा टोला भाजप आमदार सुरेश धस यांनी लगावला आहे.
पुढे बोलताना सुरेश धस म्हणाले,बीड जिल्ह्यात इतकी दुर्दैवी घटना घडली आहे.माझी पंकजा मुंडे यांना विनंती आहे की,आता तरी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना भेटून यावे. संतोष देशमुख आणि धनंजय देशमुख हे दोघे भाऊ भाजपचे बुथप्रमुख होते,अशी आठवणही धस यांनी पंकजा मुंडें यांना करुण दिली आहे.
आरोपींना वर्षभरात फाशी द्या
आमदार सुरेश धस म्हणाले,संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना वर्षभराच्या आत फाशी देण्यात यावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कुणालाच सोडणार नाही असे स्पष्ट केले होते, आणि त्यांनी दिलेला शब्द पूर्ण केला असेही धस यांनी म्हटले आहे. खंडणीमुळेच ही हत्या झाली आहे.धनंजय मुंडेंनी खंडणी संदर्भात त्यांच्या बंगल्यावर बैठक झाली की नाही याबद्दल उत्तर द्यावेच.
देशमुख कुटुंबियांच्या मागण्याचा तपास व्हावा
आमदार सुरेश धस म्हणाले,एसआयटीने पुढील तपास करावा. धनंजय देशमुख,यांच्यासह मस्साजोगकरांनी केलेल्या मागण्यााचा तपास झाला पाहिजे.यातील एक मागणी मंजूर पूर्ण झाली आहे. यातील बरेच आरोपी हे बाहेर आहेत.त्यांचीपण चौकशी झाली पाहिजे. संतोष देशमुखच्या खूनाचे पान धनंजय मुंडेंच्या परस्पर कसे हलले असा सवाल धस यांनी केला आहे.मी आधीपासूनच सांगत होतो की, हे खूप भयंकर आहे.आमच्या जिल्ह्यातील नपेत्यांची संवेदनशीलता संपलेली दिसली.मी जे सांगितले होते ते सर्व मुद्दे कालच्या फोटोतून पुढे आले आहेत.