वारे धंदा…! दवाखाना दाजीचा,मेडिकल मेव्हुण्याचं;आमदार धसांनी दवाखान्याची लुटालुटी चे वास्तव मांडले विधानसभेत
गणेश दळवी आष्टी-दहा,पाच डॉक्टर एकत्र येऊन मल्टीस्पेशालिटी असे गोडंस नाव देऊन, गोरगरीब रूग्णांना लुटायचे काम करत हॉस्पीटल चे बील दिड लाख तर मेडीकल चे बिल दोन लाख होऊन,हा दवाखाना दाजीचा अन् मेडीकल मेव्हुण्याचं असल्याची सध्याची वस्तुस्थिती दिसत असून,या मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटला राज्य सरकारने निर्बंध लावावे अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी विधानसभेत केली आहे.
राज्याचे विधानसभा अर्थसंकल्प अधिवेशन सुरू असुन गुरूवार दि.२० रोजी सन २०२५ विधानसभा विधेयक क्रमांक २५ नुसार चर्चा करतांना आमदार सुरेश धस बोलत होते.पुढे बोलतांना ते म्हणाले,मी माझ्या जिल्ह्यातील हॉस्पिटल मधील वस्तुस्थिती मांडत असुन,सध्या दहा-पाच स्पेशालिस्ट डॉक्टर एकत्र येऊन मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल सुरू करतात आणि यातील मेडीकल आपल्याच जवळच्या नातेवाईकांना चालविण्यास देतात.जर एखाद्या रुग्णांचे हॉस्पीटल चे बील दिड लाख आले तर मेडीकल चे बील दिड ते दोन लाख होते.त्या मेडीकल मधील प्रत्येक औषध एमआरपी प्रमाणेच देतात.त्यामुळे गोरगरीब रुग्णांची भयानक परिस्थिती निर्माण होते.या हॉस्पीटल वर राज्य सरकारने काहितरी निर्बंध लावावेत तसेच जे हॉस्पीटल चॅरिटेबल द्वारे सुरू आहेत.त्यांचे फलक आणि दरपत्रक ही दर्शनी भागावर लावणे गरजेचे आहे.तरी पुढील अधिवेशनात यावर राज्य सरकारने निर्बंध लावावे अशी मागणीही आमदार सुरेश धस यांनी विधानसभेत केली.