व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

तालुक्याचे गत वैभव प्राप्त करण्यासाठी राजकारण्यांनी कारखान्याचे राजकारण करू नये-माजी आ.भिमराव धोंडे

0

आष्टी click2ashti-गेल्या 18 वर्षांपासून बंद असलेला कारखाना आज पुन्हा सुरु करीत आहोत.मी ठरविले असते तर स्वतःचा कारखाना सुरु केला असता पण सहकारी कारखानाच सुरु करायचा होता आणि हा महारष्ट्रात 18 कारखाने आवसानात निघाले होते.त्यापैकी 17 कारखाने खाजगी व्यक्तीने घेतले पण आपला कारखाना हा सहकारीच राहिला आणि हा कारखाना सुरु करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष सहकार्य केल्याने आज हा कारखाना सुरू होत आहे.यामुळे तालुक्याचे गत वैभव प्राप्त करण्यासाठी राजकारण्यांनी कारखान्याचे राजकारण करू नये तसेच जर कुणाला हा कारखाना चालविण्याची इच्छा असेल तर मी चावी देतो असे प्रतिपादन माजी आ.भिमराव धोंडे यांनी केले.
आष्टी तालुक्यातील कडा तथा महेश सहकारी साखर कारखाना महाराष्ट्र राज्य सहकारी बॅकेंनी 2007 साली जप्त केला होता.त्यानंतर मध्यंतरी एक दोन वर्ष इतरांनी भाडे तत्वावर घेतला होता.परंतु यावर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने आज हा ओटीएस मध्ये तडजोड करून आता पुन्हा आपल्या ताब्यात आला.आज शुक्रवार (दि.28)रोजी दुपारी 12.30 वा.बॅकेंने चेअरमन राजेंद्र धोंडे यांच्याकडे सुपूर्द केला.यावेळी माजी आ.भिमराव धोंडे बोलत होते.याप्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्राधिकृत अधिकारी चित्रसेन भुजंगराव लोमटे,द्वितीय श्रेणी अधिकारी श्री बाळासाहेब जेवे,बबनराव उगले,अनिकेत कोठेकर,चेअरमन राजेंद्र धोंडे,प्राभारी कार्यकारी संचालक सोपान मुळे,पांडुरंग गावडे यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलतांना माजी आ.धोंडे म्हणाले,आपल्या तालुक्यांमध्ये कारखाना असून सुध्या आपल्या भागातील शेतकऱ्यांना बाहेर जावे लागत होते.या कारखान्यात राजकारण कुणी आणू नये,त्यामुळे राजकारण्याना जर हा कारखाना सुरु करायचा असेल तर मी चावी देण्यास तयार आहे.तसेच मागील कर्मचा-यांचे पगार नियमानुसार त्यांचे वेतन देण्यास तयार आहे.मी शेतकरी कुटुंबात जन्माला आलो म्हणून मला हा कारखाना सुरु करण्याची तयारी आहे.आणी हा कारखाना सहकारीच आहे सहकारीच राहणार आहे.कारखाना हा आपल्याला मन लाऊन चालवायचा आहे.बीड जिल्ह्यात फक्त आपला एकच बंद होता आणि त्याचे शल्य खुप बोचत होते.आज हा कारखाना सुरु होत असल्याचे समाधान वाटते असेही त्यांनी सांगितले.यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्राधिकृत अधिकारी चित्रसेन भुजंगराव लोमटे म्हणाले, महाराष्ट्र राज्य सहकारी बॅकेंने 2007 मध्ये कारखाना जप्त केला होता. 35 कोटी थकीत होते.गेल्या महिन्यात आम्ही ओटीएसमध्ये 3/3/2025 रोजी निविदा काढली तर दि.17/3/2025 प्रस्ताव आला.तर दि.26/3/2025 रोजी 19 कोटी 52 लाख मध्ये तडजोड केली आणि आज आम्ही संचालक मंडळाच्या हा कारखाना ताब्यात देत असल्याचे त्यांनी सांगितले.उपस्थितांचे आभार माजी जि.प.सभापती नियामत बेग यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.