खोक्या प्रकरणात मला व्हिलन ठरवून माझ्या खुनाचा कट आमदार सुरेश धस यांचा गौप्यस्फोट
पत्रकार परिषदेत मांडली सत्य परिस्थिती
आष्टी click2ashti-सतीश भोसले उर्फ खोक्या प्रकरणात मला व्हिलन ठरवून माझ्या खुनाचा कट रचण्यात आला होता,असा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे.सतीश भोसले हा हरिणाची शिकार करून सुरेश धस यांना पुरवतो, असे बिष्णोई समाजाला सांगण्यात आले होते.तसेच माझा खून करण्यासाठी या समाजातील काही माणसांना राजस्थानवरून विमानाने मुंबईत आणण्यात आले होते. या लोकांना मला मारण्यासाठीच मुंबईत आणले असल्याचा दावा सुरेश धस यांनी केला आहे.

आष्टी येथील औव्दैतचंद्र निवासस्थानी मंगळवार (दि.१)रोजी सायंकाळी ५ वा.आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आ.धस बोलत होते.यावेळी ते पुढे बोलतांना आ.धस म्हणाले,जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण उचलून धरले होते.या संपूर्ण प्रकरणात राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.यामुळेच मंत्री धनंजय मुंडे यांना देखील राजीनामा द्यावा लागला आहे.या सर्व घटनांदरम्यान सतीश भोसले उर्फ खोक्या भोसले या सुरेश धस यांच्या कार्यकर्त्यांवर देखील अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत.सतीश भोसलेला अटक देखील करण्यात आली.सतीश भोसले हा हरिणाची शिकार करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.या माध्यमातून आपल्याला जिवे मारण्याचा कट रचण्यात आला होता, असा आरोप सुरेश धस यांनी केला आहे.सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या माध्यमातून सुरेश धस हे हरणांचे मांस खात असल्याचे पसरवण्यात आले. त्यात राजस्थान मधून बिष्णोई समाजाची काही माणसे थेट विमानाचे तिकीट काढून मुंबईत आणण्यात आले.या माध्यमातून मला मारण्याचा कट रचण्यात आला असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला आहे.बिष्णोई समाजाला सुरेश धस यांना हरणाचे मास कसे पुरवले जात होते, हे पटवून सांगण्यात आले होते,असे देखील सुरेश धस यांनी म्हटले आहे.पुढे बोलताना सुरेश धस म्हणाले,इतक्या खालच्या दर्जाचे राजकारण बीडमध्ये जे सुरू आहे ते योग्य नाही. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि तृप्ती देसाई यांना इथल्या खाचा-खोचा माहिती नाहीत.त्या काही पण बोलतात.खोक्याच्या प्रकरणात हे अडचणीत.अरे कशाचे अडचणीत? माझा काय संबंध त्याच्याशी? तो त्याचा शिक्षा भोगत आहे.त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही.परंतु परळीवरून माणूस पाठवायचा,त्याने स्टेटमेंट करायचे आणि तेही हरणाच्या माणसाबद्दल ज्याचा काडीमात्र माझ्याशी संबंध नाही.