कॅबिनेट मंत्री पदाचा फायदा घेऊन,आम्ही केलेले कामे दाखवून आम्हाला गिफ्ट देऊन नये-आमदार सुरेश धस
आमदार धसांनी घेतला मंत्री पंकजा मुंडे यांचा खरपुस समाचार
आष्टी click2ashti-कॅबिनेट ला आलेला प्रस्ताव पाहूण आणि तुम्ही कॅबिनेट मध्ये असल्याने कुणीही याचा फायदा घेऊ नये,सिंदफनासाठी मी सन-2014 पासून प्रयत्न करत असून,यासाठी पहिल्या पासुन पाठपुरावा मी स्वतःकेला आहे.त्याचे पुरावेही माझ्याकडे आहेत.त्यामुळे मंत्रिमंडळात असल्याचा आपण गैरफायदा घेऊ नये,देयचेच होते तर परळीला घेऊन गेलेले कॉलेज आमच्या मतदार संघात आणायचे ना,मंत्रि महोदयांनी पाठपुरवठा न केलेल्या कामांचे गिफ्ट आमच्या मतदारसंघाला देऊन उपकार करू नये,असा खरपुस समाचार आमदार सुरेश धस यांनी ना.पंकजा मुंडे यांचा नाव न घेता घेतला आहे.

आष्टी येथील अव्दैतचंद्र निवासस्थानी गुरवार (दि.३)रोजी सायंकाळी ६.३० वा.आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आमदार सुरेश धस बोलत होते.पुढे बोलतांना ते म्हणाले,माझ्या मतदार संघातील शिरूर (कासार) तालुक्यातील ब्रम्हनाथ येळंव व निमगाव ता.शिरूर(का) जि.बीड या को.प.बंधा-यांचे बॅरेज मध्ये रुपांतरण करण्याचे कामाचे अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी,जलसंपदा विभागामार्फत कार्यवाही प्रगतीत आहे.सदर कामाच्या प्रस्तावास राज्य तांत्रिक सल्लागार समिती -1. नाशिक यांनी दि. 05/07/2024 रोजी झालेल्या बैठकीत मान्यता दिलेली असून प्रस्ताव शासनास निर्णयार्थ सादर आहे.सदर प्रस्तावास मंत्रीमंडळ बैठकीमध्ये मंजुरी आवश्यक आहे.ब्रम्हनाथ येळंब व निमगाव(मायंबा) ता.शिरूर (का) जि. बीड या को.प.बंधा-यांचे बॅरेज मध्ये रुपांतरण करण्याचे काम या प्रस्तावास आगामी मंत्रीमंडळ बैठकीमध्ये हे पत्र मी 13/12/2024 रोजीच दिले होते.यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ह्या कामाचे कॅबिनेटमध्ये प्रस्ताव घेतल्याचे आपल्या जिल्ह्यातील कॅबिनेट मंत्रीमहोदय यांना समजताच या कामाचे श्रेय घेऊन आष्टी मतदारसंघाला आम्ही केलेले कामे दाखवून आम्हाला गिफ्ट देऊन नये असा खरपुस समाचार आ.सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांचा नाव न घेता घेतला आहे.