चुकीच्या बातम्या प्रकाशित करून बदनामी करू नये-तहसिलदार
महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण आमदार सुरेश धस यांच्याहस्ते संपन्न
आष्टी click2ashti-महाराष्ट्र दिनानिमित्त आज तहसिल कार्यालयात मुख्य ध्वजारोहण आमदार सुरेश धस यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी राष्ट्रगीत हे मोबाईल वरून लावण्यात आले होते.राष्ट्रगित सुरु झाले अन् चार-पाच सेकंद लाईट गेल्याने उपस्थितांना राष्ट्रगीत मधूनच सुरू झाले असे वाटले.व काहि पत्रकारांनी राष्ट्रगीत मधूनच सुरु झाले व राष्ट्रध्वजाचा अपमान झाला अशा बातम्या सोशल मिडियावर व्हायरल केल्या.तरी पत्रकारांनी शहानिशा करून बातम्या प्रसिध्द कराव्यात चुकीच्या बातम्या देऊन बदनामी करू नये असे आवाहन आष्टी तहसिलदार वैशाली पाटील यांनी केले आहे.
महाराष्ट्र दिनानिमित्त आज दि.1 मे रोजी आष्टी येथील तहसिल कार्यालयात मुख्य ध्वजारोहण आमदार सुरेश धस यांच्याहस्ते सकाळी 8 वा.करण्यात आले.यावेळी राष्ट्रध्वज आमदार यांनी फडकावून ध्वजाला सलामी दिली व राष्ट्रगीत सुरु झाले.परंतु राष्ट्रगीत सुरु होताच चार-पाच सेकंद लाईट गेल्याने उपस्थितांना हे राष्ट्रगीत मधूनच सुरू केले असे वाटले.परंतु राष्ट्रगीत पहिल्या पासून न चुकतबरोबर घेण्यात आले आहे.तरी सोशल मिडिया वर हे राष्ट्रध्वजाचा अपमान व भोंगळ कारभार अशा बातम्या प्रसिध्द झाल्या आहेत.पत्रकारांनी जिथे चुक होईल ते समाजासमोर आणलेच पाहिजे कारण हा त्यांचा अधिकार आहे.पण प्रत्येक बातमी देताना शहानिशा करून प्रकाशित करण्याचे आवाहन तहसिलदार वैशाली पाटील यांनी केले आहे.
जबाबदारी सांभाळणे गरजेचे
आज 1 मे रोजी ध्वजारोहण करतांना राष्ट्रगीत सुरू झाले तेव्हा एक कडवे सोडून दिल्याचे समजून आले.पण असे कार्यक्रम घेतांना प्रमुख अधिकारी यांनी जो कर्मचारी व्यवस्थित जबाबदारी व कामात हलगर्जीपणा करणार नाही त्यांच्याकडे देणे गरजेचे आहे.
–सुरेश धस आमदार आष्टी