तिरंगा यात्रा ‘वंदे मातरम’, ‘भारत माता की जय’अशा घोषणांनी परिसर दणाणला
भारतीय जवानांनी चोख उत्तर दिले-आ.धस
आष्टी click2ashti-अतिरेक्यांनी भारतातल्या निष्पाप लोकांवरती भ्याड हल्ला करून अतिशय क्रूर पद्धतीने त्यांची हत्या केली.पतीला पत्नीसमोर मारले.त्या माऊलीचे कुंकू त्यांनी उध्वस्त केले.याचा रोष पूर्ण जगभरात होता.या हल्ल्याचे प्रत्युत्तर भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचे ९ अतिरेकी अड्डे उध्वस्त करून पाकिस्तानला धडा शिकवण्याचे काम केले आहे. त्या शौर्याला मानवंदना देण्यासाठी शहरात तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन आमदार सुरेश धस यांनी केले.
भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूर या यशस्वी मोहिमेला मानवंदना व वीर जवानांच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी शहरात रविवार दि.१८ रोजी सकाळी ८.३० वा.मोठ्या उत्साहात व देशभक्ती पूर्ण वातावरणात तिरंगा यात्रा काढण्यात आली.पंचायत समिती येथून तिरंगा यात्रेची सुरुवात करण्यात आली.या यात्रेच्या वेळी ‘वंदे मातरम’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देण्यात आल्या.यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना आ.धस बोलत होते.यावेळी नगराध्यक्ष जिया बेग,गणेश शिंदे,माऊली जरांगे, रंगनाथ धोंडे,गटनेते किशोर झरेकर,अशोक मुळे,अनिल ढोबळे,माजी सैनिक खोटे,माजी सैनिक भोसले कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पुढे बोलतांना आ.धस म्हणाले,जम्मू-काश्मीर राज्यातील पहेलगाम येथे २२ एप्रिल रोजी पर्यटनासाठी गेलेल्या भारतीय नागरिकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला.यामध्ये आपल्या कुटुंबीयांसोबत गेलेल्या पुरुषांना त्यांचा धर्म विचारून बंदुकीतुन गोळ्या झाडल्या.या घटनेचा तीव्र निषेध झाला.सरकारने या क्रूर घटनेच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने पाकिस्तानात जाऊन येथील अनेक दहशतवादी हल्ले उध्वस्त केले. महिलांचे कुंकू पुसलेल्या बदला घेतलेल्या या ऑपरेशनला ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव दिले.भारतीय लष्कराने दाखविलेल्या शोर्याचा, पराक्रमाचा अभिमान बाळगत ऑपरेशन सिंदूर’ च्या समर्थनार्थ ‘आम्ही आष्टीकर’ यांनी आष्टीत भव्य तिरंगा यात्रा काढली.या यात्रेत नागरीक, व्यापारी यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती.शहरातील पंचायत समितीमधील हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून सकाळी ८.३० वा. तिरंगा यात्रेस सुरुवात झाली.ही यात्रा पंचायत समिती,किनारा चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक,शनि चौक,कापड बाजार,अग्नि चौक,कमानवेस या अशी रॅली निघाली.यावेळी रॅलीत सहभागी आष्टीकरांनी वंदे मातरम,भारत माता की जय अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.या रॅलीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे यात्रेचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.तिरंगा यात्रेसाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
भारतीय जवानांनी चोख उत्तर दिले-आ.धस
पाकिस्तान त्यांच्या परंपरेनुसार भारताच्या सीमेत घुसखोरी करणे, निरापधारांच्या हत्या करणे,या सर्व विषयाला चोख उत्तर भारतीय जवानांनी दिले आहे. भारत वीर प्रसवा असून वारंवार केवळ पाकिस्तानच नव्हे तर देशातली कुठलीही शक्ती भारताच्या विरोधात उभी राहिली, तरी त्याला मातीत गाढण्याचे काम भारतीय जवान करत आले आहेत.धर्म विचारून गोळी घालने ही विकृती ठेचून काढण्यासाठी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,अमित शहा है। देश भारतीय जवानांच्या हातामध्ये सुरक्षित आहे.
-सुरेश धस,आमदार भाजपा आष्टी
तिरंगा झेंडे यात्रेचे आकर्षण…
ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीतेला मानवंदना देण्यासाठी प्रत्येक नागरिकांच्या हाती असलेले भव्य तिरंगा झेंडे आकर्षण ठरले आहे. हे भव्य तिरंगा झेंडे हाती घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने यात्रेत सहभाग घेतला होता. तसेच तिरंगा यात्रा ही केवळ यात्रा नाही,तर ती भारताच्या राष्ट्रीय अभिमानाचे आणि एकतेचे प्रतिक आहे.या यात्रेत विविध समुदाय, विविध वयोगटांचे लोक एकत्र आले होते.पाकिस्तानला धडा शिकवण्याचे काम केले आहे.या यात्रेमुळे एकतेच्या भावनेसह आपल्या देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा नागरिकांना मिळाली आहे.
वीर माता,वीर पत्नींचा केला सन्मान
आष्टी, पाटोदा,शिरूर तालुक्यातील भारत मातेसाठी शहिद झालेल्या जवानांच्या वीर पत्नीं सारीका संजय भाकरे, मनिषा रमेश काकडे,कमल भागवत सोंडगे, गोदावरी पांडुरंग तावरे,सिता पोपट गायकवाड,अरूणा भगवान नागरगोजे,रत्नमाला अजित वाल्हेकर,भाग्यश्री तुकाराम राख यांचा सन्मान आमदार सुरेश धस यांच्याहस्ते सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.