मयत सभासद यांच्या वारसास “नागेबाबा” सभासद सुरक्षाकवच योजनेअंतर्गत दहा लाख चा धनादेश
आष्टी-तालुक्यातील लिंबोटी येथील कै.संदीप अश्रुबा आंधळे यांचे मागील काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले.ते श्री संत नागेबाबा मल्टिस्टेट कडा शाखेचे खातेदार सभासद होते.त्यांनी नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत नाव नोंदणी केलेली होती.आज त्यांच्या वारसास दहा लाख रुपये किमतीचा धनादेश नागेबाबा मल्टिस्टेटच्या वतीने शाखेचे खातेदार व मान्यवरांच्या उपस्थितीत सुपूर्त करण्यात आला.
श्री संत नागेबाबा मल्टिस्टेट संस्था वर्षाचे 365 दिवस ग्राहकांना सेवा देताना केवळ आर्थिक क्षेत्रात कार्य न करता आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशाने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कडूभाऊ काळे यांच्या मार्गदर्शनातून व संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जपत धार्मिक,शैक्षणिक,सामाजिक व सभासदांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य करत आहे.संस्थेतील प्रत्येक सभासद हा आपला परिवारातील घटक आहे.याचा विचार करून आपल्या संस्थेतील सभासदांसाठी नागेबाबा सभासद सुरक्षा कवच योजना चालू केलेली यामध्ये अपघाती मृत्यू झाल्यास सभासदांच्या वारसांना 10 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत करण्यात येते तसेच अपघात झाल्यास 5 लाख रुपयांपर्यंत हॉस्पिटल खर्च देण्यात येतो.या योजनेतून त्या कुटुंबाचा खरा आधार देण्याचे काम संस्था करत असते.श्री संत नागेबाबा मल्टिस्टेट कडा शाखेचे खातेदार सभासद कै.संदीप अश्रुबा आंधळे यांचे मागील काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले.त्यांनी नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत नाव नोंदणी केलेली होती.आज रविवार(दि.२२)रोजी त्यांच्या वारसास दहा लाख रुपये किमतीचा धनादेश नागेबाबा मल्टिस्टेटच्या वतीने शाखेचे खातेदार व मान्यवरांच्या उपस्थितीत सुपूर्त करण्यात आला.कै.संदीप आंधळे यांच्या मागे पत्नी विद्या आंधळे,दोन लहान मुली,आई-वडील असे कुटुंब आहे.यावेळी ह.भ.प. विष्णू महाराज आंधळे,लिंडोबी ग्रामपंचायतचे सरपंच,सीए अनिकेत आंधळे,सरपंच समाधान आंधळे,सभापती बाबासाहेब आंधळे गोरख आंधळे,शिवाजी आंधळे व इतर ग्रामस्थ नागेबाबा परिवारातील सदस्य राजूभाऊ चिंधे,राऊत रेवणनाथ नितिन घोडके,आशिष शिंदे, प्रवीण राख उपस्थित होते.तसेच नागेबाबा मल्टीस्टेट कडा शाखेचे पालक अधिकारी देविदास कदम सुरक्षा कवच अधिकारी योगिता पटारे,एरिया डेव्हलपमेंट ऑफिसर सचिन बोडखे शाखाधिकारी नवनाथ वंजारे,लहू कर्डीले,दादासाहेब तांबे,अक्षय साळुंके उपस्थित होते.