व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आमदार धसांनी घेतली शेळके कुटूंबीयांची भेट

0

आष्टी click2ashti-अहिल्यानगर-पुणे महामार्गावर जातेगाव फाटा शिवारात आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारची धडक बसून,दुचाकीवरील हॉटेल व्यावसायिकाचा मृत्यू झाला.त्यानंतर या अपघाताचे सोशल मिडियावर विरोधकांनी भांडवल करत आगडोंब उठविला होता.हा अपघात आहे त्यावर पोलिस सविस्तर तपास करतील असे सांगत शुक्रवार (दि.11)रोजी सायंकाळी विधानसभेचे अधिवेशन आटोपून आष्टीकडे येताना आमदार सुरेश धस हे मयत नितीन शेळके यांच्या घरी जाऊन भेट झालेल्या दुर्दैव घटनेबद्दल खंत व्यक्त करत कुटुंबियांना धिर दिला.
सोमवारी (७ जुलै) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.नितीन प्रकाश शेळके (३४,रा.पळवे खुर्द, ता.पारनेर)असे मृत दुचाकीस्वाराचे नाव होते.अपघात झाल्यानंतर आमदार सुरेश धस यांचे पुत्र स्वतः सागर धस हे जखमीला दवाखान्यात घेऊन गेले व उपचार करण्यास सांगितले परंतु दुर्दैवाने नितीन यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.या दुर्दैवी घटनेचा सोशल मिडीयावर विरोधकांनी ट्रोल करत आरोपांची लाखोळी केली.यानंतर स्वतः आमदार सुरेश धस यांनी मिडीयासमोर येऊन या अपघाताची संपुर्ण चौकशी करा,माझ्या मुलांच्या रक्ताचे नमुनेही तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवा यात मी कसलाही सहभाग घेणार नाही हे जाहिर करत पोलिसांनी योग्य तो तपास करावा अशी सुचनाही धस यांनी दिली.त्यानंतर अधिवेशन आटोपून ते आष्टीकडे येत असताना मयत नितीन शेळके यांच्या घरी जाऊन भेट झालेल्या दुर्दैव घटनेबद्दल खंत व्यक्त करत कुटुंबियांना धिर दिला.
अपघातानंतर सागर धस स्वतः पोलिस ठाण्यात
अपघाताच्या घटनेनंतर सागर धसने स्वतःच सुपा पोलिस ठाण्यात जाऊन माहिती दिली.त्यानंतर स्वप्निल व त्यांचे भाऊ सुपा पोलिस ठाण्यात गेले असता,नितीन व स्वप्निल यांचे नातेवाईक प्रसाद भास्कर तरटे पोहोचले.त्यावेळी सागर धस पोलिस ठाण्यातच होते.त्यानंतर सुपा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.