धामणगांवचे माजी सैनिक शेख मन्सुरभाई यांचे निधन
click2ashti-आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील माजी सैनिक शेख मन्सुरभाई यांचे अल्पशा आजाराने शुक्रवार दि. १ ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ६७ वर्षे होते. अतिशय शिस्तप्रिय, हळव्या मनाचे मनमिळावु व्यक्तीमत्व म्हणुन ते सर्वत्र परिचीत होते.
भारतीय सैन्यात प्रदिर्घ सेवे नंतर त्यांनी आष्टी येथील हैद्राबाद बँकेत व आष्टीच्या ग्रामिण रुग्णालयात अनेक वर्षे सुरक्षा रक्षक म्हणुन काम केले होते. त्यांच्या हसतमुख,प्रेमळ स्वभावामुळे आष्टी तालुक्यात व इतरत्र त्यांचा मोठा मित्र परिवार होता.गेल्या काही दिवसांपासुन मधुमेहामुळे त्यांना त्रास होत असल्याने नगरच्या साईदिप हॉस्पिटलमध्ये त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. उपचारादरम्यान शुक्रवारी पहाटे त्यांचे निधन झाले. त्यांचा दफनविधी धामणगांव येथील कब्रस्थानमध्ये शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता करण्यात आला.यावेळी त्रिदलच्या माजी सैनिक मित्रपरिवाराच्या वतीने त्यांना सलामी देत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या पश्चात दोन मुली, जावई, नातवंडे,दोन भाऊ असा परिवार आहे.पत्रकार सय्यद बबलुभाई यांचे ते सासरे होते.त्यांच्या अंत्यविधीप्रसंगी विवीध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली.