व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

येणारी निवडणुक तन,मन,धनाने स्वबळावर लढणार,कार्यकर्त्यांनी कामाला लागावे-माजी आ.भीमराव धोंडे

0

click2ashti-आठ महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाची उमेदवारी आपल्याला असतांना पक्षाने ऐनवेळी आपली उमेदवारी नाकारली तरी मी आपल्या जिवावर अपक्ष निवडणुक लढलो आपण प्रामाणिक पणे काम केले.मात्र यश आले नाही,झाले गेले सोडून द्या आणि येणा-या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत तन,मन,धनाने स्वबळावर लढणार,कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन माजी आ.भीमराव धोंडे यांनी केले.
आष्टी येथील मोरेश्वर मंगल कार्यालयात माजी आ.भीमराव धोंडे यांनी अभिष्टचिंतन सोहळा व कार्यकर्ता मेळावा मंगळवार (दि.५)रोजी दुपारी २ वा.आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना माजी आ.भीमराव धोंडे बोलत होते.यावेळी व्यासपीठावर माजी आमदार साहेबराव दरेकर,लालासाहेब कुमकर,
अशोक साळवे,माजी सभापती सुवर्णा लांबरूंड,पांडूरंग गावडे, रत्नदिप निकाळजे,युवा नेते अजय धोंडे,पांडुरंग गावडे,यांच्यासह आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.पुढे बोलतांना माजी आ.धोंडे म्हणाले,मागच्या आठ महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत आपला पराभव झाला पक्षाने आपला अधिकार तिकिटावर असतांना दुसऱ्या उमेदवाराला हि उमेदवारी दिली.मात्र आता येणारी निवडणुकीत आपण तण,मन,धनाने लढणार असल्याचे सांगत स्वबळाचा नारा माजी आ.धोंडे यांनी दिला आहे.माजी आमदार साहेबराव दरेकर म्हणाले,सध्याची राजकारणाची परिस्थिती जुन्या काळातील तमाशातील कलाकारांन सारखी झाली आहे. राजकारणात एकमेकांचे विरोधक जरी असलोत तरी दोस्ती तुटली नाही.सध्या प्रामाणिक कार्यकर्त्यांन पेक्षा चमण्यांना महत्व जास्त असल्याची खंत व्यक्त केली.युवानेते डॉ.अजय धोंडे म्हणाले,साहेबांनी आज पर्यंत प्रामाणिक पणाचे राजकारण केले त्याचे दुष्परिणाम आपण पाहत आहोत.परंतु आता आरे ला कारे म्हणण्याची तयारी कार्यकर्त्यांनी ठेवावी आपण त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वेगळा निर्णय घ्यावा लागणार आहे-धोंडे
आपण विधानसभा निवडणुक अपक्ष लढविल्या मुळे भाजपाने आपल्याला पक्षातून काढले आहे.परंतु आपण पंकजा मुंडे यांना भेटणार आहोत.जर आपला विचार झाला नाही तर आपण वेगळ्या पक्षात जाण्याचा निर्णय घ्यावा लागणार असल्याचे माजी आ.धोंडे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.