आमदार धसांना बदनाम करण्याची जबाबदारी घेतली काहि नगर पंचायत पदाधिका-यांनी….
आष्टीत नगर पंचायत पदाधिका-यांचा प्रताप
आष्टी-नगर पंचायत निवडणूकीत आ.धसांनी डोक्यावरचा हात काढला तर एकही नगरसेवक निवडूण येण्याच्या लायकीचा नाही,आमदार सुरेश धस यांच्यावर विश्वासठेवत धसांनी ज्यांच्या घरचे सुध्दा मतदान पडत नाही अशांना निवडूण आणण्यासाठी आमदार सुरेश धस पायात भिंगरी घालून या भंगरी उमेदवारांना निवडून आणतात परंतु निवडून आल्यानंतर आपल्याला काय काम करावे लागते याची थोडीसुध्दा अक्कल नसलेल्या नगरसेवक व नगरपंचायतच्या प्रतिनिधींनी जणू काय? आमदार सुरेश धसांना बदनाम करण्याची जबाबदारीच घेतल्याचे दिसून येत आहे.
शहरातील बाजार पेठेमध्ये आपल्या हद्दीत अनेक अनधिकृत अतिक्रमणे पुन्हा करण्यात आली आहेत.आपण ती अधिकृतपणे असल्यासरखी डोळेझाक करीत आहेत.मध्यंतरी आ.सुरेश अण्णा धस यांच्या प्रयत्नातून नगरविकास खात्यांतर्गत शहरात न भूतो न भविष्यती अशी सुधारणा झाली यामुळे शहराला याचा निच्छित फायदा देखील झाला.मात्र त्यांनी एवढे करूनही आपण त्यांनाच चुकीचं ठरवत असल्याचे एकंदरीत चित्र आहे.कारण आपल्या हद्दीत त्या कामानंतर अनेक अतिक्रमणे झाली परंतु ती अतिक्रमणे देखील स्वतःआ.सुरेश अण्णा धस यांनीच रस्त्यावर उतरून काढून घ्यावीत अशी आपल्या प्रशासनाची आणि पदाधिकाऱ्यांची इच्छा असावी असे सध्याच्या न.प.च्या कारभारावरून दिसून येत आहे.म्हणजे निधी ही आमदर महोदयांनी आणायचा,शहराचा कायापालट करायचा,मात्र नागपंचायत अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी झालेला विकास बेढप कसा होईल यावर भर देण्याचा प्रकार शहरातील विकास कामानंतर झालेल्या अतिक्रमणावरून सद्यस्थितीत दिसून येत आहे.पण या नगर पंचायतच्या पदाधिका-यांना काहिही घेणे देणे नसून,प्रत्येक दुकानदार आपल्या दुकानाचे फलक रस्तावर लावत असून,त्यांना साधे दुकानदारांना फलक रस्तावर लाऊ नका एवढे सांगण्याचे कष्ट घेता येत नाही.आपण जर दुकानदारांना सांगीतले तर आपण वाईट होतोल असे सांगत आपली जबाबदारी नगर पंचायत पदाधिकारी झटकून व दुर्लक्ष करत आहेत.एवढेच नाही तर भरदिवसा बाजारतळ परिसरात काढलेल्या अतिक्रमाणावर परत अतिक्रमण केले.हे माञ नगर पंचायत पदाधिका-यांना नाही दिसले का?.या कामासाठी सदरील अतिक्रमाणासाठी अतिक्रमण धारकाने हजारो रूपये खर्च केले.आता हे अतिक्रमण काढण्यासाठी पुन्हा आ.धस यांनीच रस्त्यावर उतरावे आणि सदरील अतिक्रमण काढा म्हणून सांगावे म्हणजे पुन्हा अतिक्रमण धारकांचा रोष आमदार धसांनी घ्यायचा आणि पदाधिकाऱ्यांनी चिडीचूप राहायचे असे एकंदरीत चित्र आहे.
महिला पदाधिका-यांचे अधिकार कागदोपञीच
एकीकडे शासन महिलांना ५०%आरक्षण देत त्यांना अधिकारी देत आहे.आष्टी नगर पंचायतमध्येही १७ पैकी ९ महिला नगरसेवक आहेत.पण ह्या फक्त बैठकी पुरत्याच नगर पंचायतला येतात बाकी माञ,कारभार नवरा,मुलगा,सासरा हे हाकतात.त्यामुळे महिला नगरसेवक फक्त कागदोपञीच असल्याचे दिसून येत आहे.