व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

नव्याचे नऊ दिवस…! हप्ता वाढीसाठी पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांच्या अवैध धंद्यावर धाडी

0

आष्टी-आष्टी पोलीस स्टेशनला नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांनी आष्टी पोलिस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यावर धाडसत्र सुरू केले असून विनापरवाना देशी,विदेशी दारूविक्री केल्याप्रकरणी विविध ठिकाणी धाडी केल्या असून बारा हजार रुपयाचा माल जप्त केला आहे.परंतु ह्या धाडी म्हणजे नव्याचे नऊ दिवस असून,हाप्ता वाढीसाठी हि कारवाई केल्याची चर्चा सुरू आहे.
गेल्या आठ दिवसापूर्वी आष्टी तालुक्यातील पोलीस निरीक्षक सलिम चाऊस यांची बदली झाली असून बीड येथील पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांनी आष्टी पोलीस स्टेशनचा कार्यभार घेतला. त्यांनी कार्यभार घेतात तालुक्यातील अवैध धंद्यावर धाडसत्र सुरू केले असून केरूळ येथे महेश ज्ञानदेव सूर्यवंशी यांच्याकडे विनापरवाना देशी दारू विक्री केल्याची माहिती मिळतात पथक पाठवून १ हजार ९७० रुपयांच्या माल जप्त केला तर फत्तेवडगाव येथे गणेश वसंत पवार हा देशी-विदेशी दारू विक्री करत असल्याची माहिती मिळताच २ हजार ७०० रुपयांचा माल जप्त केला.तसेच पिंपरी येथील दिलीप तुकाराम वारुळे यांच्याकडून सात हजार रुपयांची अवैधरित्या देशी-विदेशी दारू जप्त केली. रुई नालकोल येथील यात्रेमध्ये अर्जुन भीमराव पवार यांनी सोरट नावाचा जुगार लावला होता त्यावर ही कारवाई केली आहे.ही कारवाई कडा पोलीस चौकीचे सपोनि भाऊसाहेब गोसावी, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पवार, पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब राख,सचिन गायकवाड, दीपक भोजे ,मंगेश मिसाळ प्रताप घोडके आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.आष्टी तालुक्यात अवैध धंद्यावर धाडसत्र सुरू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
कदम साहेबांनी कायम दरारा ठेवावा
दरम्यान आठ दिवसापुर्वी आष्टी पोलिस ठाण्याचा कारभार हाती घेऊन धाड सञ सुरू करत कारवाईचा बडगा दाखविला आहे.त्यांनी जी मोहिम हाती घेतली ती आता कायम ठेऊन खाकी वर्दीचा दरारा कायम ठेवावा अशी मागणी जनतेतून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.