२८ वर्षानंतर भाजपा चा बालेकिल्ला ढासाळला; कसब्यात काॅग्रेसचे रवींद्र धंगेकर मोठ्या फरकाने विजयी
पुणे-आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा
विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली.या निवडणुकीत भाजपचा बालेकिल्ला ढासळला असून महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत.या पराभवाची जबाबदारी हेमंत रासने यांनी घेतली आहे.
कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार रवींद्र दंगेकर यांचा विजय झाल्यानंतर चोपडा शहरात काँग्रेस पक्षातर्फे जल्लोष साजरा करण्यात आला. दुपारी साडेबारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर काँग्रेस पक्षाने जल्लोष साजरा केला.यावेळी फटाके फोडून ढोल वाजवून आनंद साजरा केला.यावेळी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील,शहराध्यक्ष नंदकिशोर सांगोरे,मधुकर बाविस्कर,चेतन बाविस्कर आदी उपस्थित होते.मतदार संघात मोठ्या प्रमाणात पैशांचा पाऊस पाडला गेला.मात्र जनतेने धनशक्ती विरोधात स्वतःच निवडणूक हाती घेऊन मतांचा पाऊस माझ्यावर पाडल्याने माझा विजय सुकर झाल्याची भावना महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केली आहे.पहिल्या फेरीपासूनच काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आघाडीवर होते.त्यांनी एकाही फेरीत भाजपच्या हेमंत रासने यांना वरचढ होऊ दिले नाही.प्रत्येक फेरीत त्यांनी दीड ते दोन हजारांची लीड घेतली