बोगस वाचनालयावर फौजदारी गुन्हा दाखल करा;कागदोपञी चालणा-या वाचनालयाला आशिर्वाद कुणाचा?
जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांनी लक्ष घातल्यास मोठा घोटाळा येईल बाहेर
आष्टी-गणेश दळवी
आष्टी-शहरी-ग्रामिण भागातील जनतेला सामाजिक,राजकीय,शैक्षणिक माहिती मिळावी म्हणून राज्यशासनाच्यावतीने सार्वजनिक वाचनालय सुरू आहेत.पण हे सार्वजनिक वाचनालय आष्टी तालुक्यात कागदोपञीच सुरू असून,वृत्तपञे न घेता फक्त बिले घेऊन वाचनालय सुरूअसल्याचे दाखविले जाते.आशा शासनाचे अनुदान लाटणा-या या बोगस वाचनालयावर गुन्हा दाखल करून,कागदोपञी चालणा-यां वाचनालयाला आशिर्वाद कुणाचा याची चौकशी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांनी केली तर नक्कीच मोठा घोटाळा बाहेर येईल अशी आपेक्षा वाचक प्रेमींमधून होत आहे.
सध्या तालुक्यात शासकीय अनुदान लाटणारे कागदावरचे सार्वजनिक वाचनालय 48 आहेत.या वाचनालयात जाऊन पाहिले तर अनेक प्रकार समोर येतात.यातच पुरेशी पुस्तके नसतात.वृत्तपञे ही नसतात.केवळ बोटाबर मोजण्या इतकेच पुस्तके आढळून येतात.एक ना धड बाराभर चिंद्या असलेल्या वाचनालयाची आवस्था सध्या न पाहण्या सारखीच झाली आहे.सार्वजनिक वाचनालय हे केवळ वाचनालय अनुदान लाटण्यासाठीच असतात की,काय?असा प्रश्न वाचकांनी केला आहे.याबाब अनेक वाचनालयाची माहिती घेतली असता,हे वाचनालय कागदावरच असल्याचे दिसून येतात.याबाबत सध्या वाचनालय “ड”वर्गात चालवत असून त्यांना पञकारांनी विचारले असता नाव न छापण्याच्या अटीवर अशी माहिती दिली,माझे वाचनालय “ड”वर्गात असून मला वर्षाकाठी तीस हजार अनुदान मिळते.यामधून जवळपास 17 रजिस्टर मेटेंन करावे लागतात.तसेच मिळण्या-या अनुदानातून 25% रकमेचे पुस्तक खरेदी करावी लागते.व वर्षातून एकदा वाचनालय तपासणीसाठी अधिकारी येतात त्यांनाही खुष करावे लागते.त्यामुळे वाचनालय चालविणे अवघड असल्याचे सांगितले.
वाचनालय आहेत कुठे?
कागदावरच दाखविण्यात येत असलेले वाचनालयचा आष्टी तालुक्यात याचा शोध घेतला असता.अनेक वाचनालय गायब असल्याचे आढळून आले आहे.त्यामुळे वाचक म्हणतात हे वाचनालय आहेत,कुठे?
तपासणी साठी अधिकारी येतात,माल घेऊन जातात
वर्षातून एकदा वाचनालय तपासणीसाठी वरिष्ठ अधिकारी येतात.ते वाचनालत न जाता चांगल्या हाॅटेलमध्ये थांबून सगळे वाचनालय वाल्यांना एकञ बोलवून ठरलेली रक्कम अदा करत तपासणी करतात व माल घेऊन जातात.
वर्षात फक्त पंधरा दिवसच पेपर घेतात
माझ्या पेपर स्टाॅलवरून दोन तीन वाचनालयावाले सोडले तर एकही वाचनालय वृत्तपञ घेत नाही.परंतु तपासणीसाठी अधिकारी येणार असल्यावर माञ पंधरा दिवस बरेच वाचनालयवाले येऊन पेपर घेऊन जातात ह्या पध्दतीमुळे वृत्तपञ विक्रीलाही खिळ बसत असल्याचे आष्टीचे वृत्तपञ विक्रेत्याने सांगीतले.