व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

खुंटेफळ साठवण तलावाच्या बाबतीत सरकारचा वेळकाढू पणा आ.आजबेंचा विधानसभेत घणाघात

मतदार संघातील विविध प्रश्नांवर केली चर्चा

0

आष्टी-तत्कालीन जलसंपदा मंञी जयंत पाटील यांनी माझ्या मतदार संघातील खुंटेफळ साठवण तलावासाठी १४.६८ कोटी रूपये मंजूर करूने या कामांचे टेडंरही फ्लॅश करण्यात आले होते.परंतु विद्येमान सरकारने यावर फक्त १५० कोटी रूपये निधी दिला.त्यातील १०० कोटी निधी पुन्हा मार्च अखेरीस लॅप्स होणार आहे.पुढच्यावर्षी फक्त ५० कोटी च निधी उपलब्ध राहिल.या खुंटेफीळ साठवण तलावाच्या बाबतीत सरकार उदासीन असून,फक्त वेळकाढूपणा करत असल्याचे आ.बाळासाहेब आजबे यांनी विधानसभेत सांगत सरकारवर तोफ डागली.
विधानसभा अधिवेशनात दि.१५ बुधवार रोजी आ.आजबे यांना प्रश्न मांडण्यांची संधी मिळाली यामध्ये त्यांनी मतदार संघातील पाणी,विज,शेती या विषयी प्रश्न उपस्थित करून,सरकारने यावर मतदार संघातील जनतेचा विचार करावा अशी मागणी त्यांनी केली.पुढे बोलतांना ते म्हणाले,आष्टी तालुक्यातील जनतेच्या हिताची आणि महत्वकंक्षा असलेली खुंटेफळ साठवण तलावाला तत्कालीन जलसंपदामंञी जंयत पाटील यांनी १४.६८ कोटी रूपायांचा निधी मंजूर करून त्या योजनेचे टेंडरही फ्लॅश करण्यात आले होते.परंतु आत्ता आलेल्या ईडी सरकारने हे काम तात्पुरत्या स्वरूपात रद्द करून ठेवली आहे.त्यामुळे आमचा आष्टी तालुका कायम दुष्काळी तालुका म्हणुन ओळख राहणार आहे यास कसलेही दुमत नाही.तसेच आष्टी,पाटोदा,शिरूर तालुक्यातील ३३ के.व्ही.चे कामेही प्रलबिंत आहेत ते ही उर्जामंञी साहेबांनी मार्गी लावाव्यात.यासह विविध प्रश्नावर आमदार आजबेंनी विधानसभेत मतदार संघातील प्रश्न मांडून सरकारने मार्गी लाववावे असेही त्यांनी सांगीतले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.