आष्टी दूध भेसळ प्रकरणातील मास्टरमाइंड आरोपी अजूनही फरार
कुंभकर्णाच्या झोपेत असलेले अन्नभेसळ अधिकारी खडबडून जागे होतील काय ?
आष्टी-शहरातील संभाजीनगर परिसरातील एका घरातून १३२ गोण्या पावडर,रसायन आणि २२० पाम तेलाचे डबे दि.१६ मार्च रोजी जप्त करण्यात आले आहे.जवळपास ९ लाख रुपयांचा मुद्देमाल या प्रकरणात जप्त करण्यात आला होता.धोकादायक रासायनिक पदार्थ वापरून दूध भेसळीच्या मोठ्या कारवाईने बीड जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली होती.या घटनेचे पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील उमटले होते.आष्टी पोलिसांनी छापा टाकला आणि संपूर्ण प्रकरण उघडकीस आणले.आठवडा उलटूनही या प्रकरणातील उर्वरित मास्टरमाइंड आरोपी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश शिंदे अद्यापही फरार असून या प्रकरणात कुंभकर्णच्या झोपे असलेले अन्नभेसळचे अधिकारी खडबडून जागे कधी होतील?या प्रकरणात अधिकाऱ्यांची मिलीभगत आहे? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून विचारला जात आहे.
आष्टी तालुक्यातील दूध भेसळीचा पर्दाफाश झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश नागनाथ शिंदे यांच्यासह अटक असलेला आरोपी नंदू मेमाणे यांच्यावर जगदंबा मिल्क प्रॉडक्ट कंपनीमध्ये रसायन पदार्थ दुधाच्या भेसळीसाठी वापरले जात असल्याबाबतचा गुन्हा आष्टी पोलीस स्टेशन येथे दि.१६ मार्च रोजी दाखल झाला होता.मात्र हा तपास अन्नभेसळ अधिकाऱ्यांकडून संत गतीने चालू असल्याचे निदर्शनास येत असून कुंभकर्णाच्या झोपेत असलेले अधिकारी याप्रकरणी कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याचे समोर येत आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेतून नाराजीचा सूर उमटत आहे. या दूध भेसळी प्रकरणाचा पर्दाफाश झाल्यानंतर आष्टी शहरालगत असणाऱ्या तवलवाडी परिसरातील अनेक दूध वितरक संघ,दूध संकलन केंद्र व शेतकऱ्याचे दूध संकलन अचानक कमी झाल्याचे निदर्शनास आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्व दूध उत्पादक शेतकरी व चेअरमन यांच्या मागील काही दिवसापासून होत असणाऱ्या संकलनाची आकडेवारी आज घडीला कमी होत आहे.कमी होत असलेल्या संकलनाची आकडेवारी विचारण्यात घेणे देखील तेवढेच गरजेचे आहे व याची चौकशी होणेही गरजेचे आहे. तसेच पशुपालन करणारे छोटे-मोठे दूध उत्पादक घरगुती मिक्सरच्या साह्याने पावडरच्या व अन्य रसायनाच्या मदतीने बनावट दूध करत असल्याचे निदर्शनास येत आहे.तवलवाडी गावच्या परिसरातील दूध देणाऱ्या पशुची आकडेवारी व त्या गावातून एकत्रितपणे दूध संकलनाची सरासरी प्रमाण जुळत नसल्याने तसेच बनावट दुधासाठी लागणारे पावडर केमिकल आणणे साहित्य तवलवाडी परिसरातील विहिरीत व इतर काढून टाकून पुरावा नष्ट केल्याची ही माहिती मिळतेय.अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केल्यानंतर या विभागाचे सहाय्यक आयुक्त सय्यद इम्रान हाश्मी इब्राहिम या प्रकरणांमध्ये काहीसे संशयास्पद असल्याचे चौकशीत दिरंगाई करत असल्याचे निदर्शनात आल्याचे दिसून येत आहे.त्यांची सखोल चौकशी करून कारवाई करण्याचीही मागणी जनतेतून होत आहे.