दुधामध्ये भेसळ खपवून घेतली जाणार नाही-मंञी संजय राठोड यांचा इशारा
कठोर कारवाईचा प्रस्ताव राष्ट्रपतींकडे पाठविणार
मुंबई-दुधात होणारी भेसळ खपवून घेतली जाणार नाही. दुधातील भेसळ रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याचा कायदा मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आला असून याबाबत पाठपुरावा करण्यात येईल,असे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी विधान परिषदेत सांगितले.
विधान परिषद सदस्य सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामध्ये झालेल्या दूध भेसळीसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.त्यावर राठोड यांनी उत्तर देताना दोषींवर कारवाई करणार असल्याचे सांगितले.या चर्चेमध्ये इतर सदस्यांनी आपल्या परिसरातील परिस्थिती सांगितली.यावर उत्तर देतांना अन्न व औषभ प्रशासन मंञी संजय राठोड बोलत होते.