व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

शाळकरी मुलीची गळफास घेऊन आत्महत्या;आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथील घटना

0

आष्टी-आजोबा,मामाकडे राहत असलेल्या एका १३ वर्षीय शाळकरी मुलीने राहत्या घरी ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या करीत जीवन संपवल्याची घटना सोमवार दि.२७ रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान घडली.दिक्षा बाबासाहेब शेलार वय वर्ष १३ असे मुलीचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील कारखेल बुद्रुक येथील दिक्षा बाबासाहेब शेलार ही बीडसांगवी येथील ससे वस्तीवर राहत असलेल्या आजोबा व मामाकडे इयत्ता दुसरीत असल्या पासून राहत आहे.आई,वडील ऊसतोडणीला जात असल्याने मामा शिक्षणासाठी संभाळ करत होते.सोमवारी घरातील सर्वजण शेतात काम करत असताना घरी असलेल्या दिक्षाने सायंकाळच्या दरम्यान घरात ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना घडली.घटनास्थळी पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांनी भेट दिली.पंचनामा पोलिस हवालदार विकास राठोड यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.