आ.सुरेश धस यांच्यावतीने शुक्रवार रोजा दावत-ए-इफ्तार पार्टी संपन्न
आष्टी-भाजपा विधानपरिषदचे आ.सुरेश धस यांच्यावतीने मुस्लिम बांधवांसाठी दावत-ए-इफ्तारचे आयोजन दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी रमजानच्या पवित्र महिन्यातील शेवटच्या शुक्रवारी दि.२१ एप्रिल रोजी आष्टी येथील लक्ष्मी लॉन येथे शुक्रवार रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
मुस्लिम समाजाचा पवित्र महिन्याचे औचित्य साधून भाजपाचे विधान परिषद आ.सुरेश धस हे दरवर्षी मतदारसंघात मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करतात.सर्वधर्मिय जातीय सलोखा जोपासला जावा, समाजा-समाजामध्ये एकता आणि सामाजिक सलोख्याचा विश्वास अधिक दृढ व्हावा या उद्देशाने रोजा इफ्तार पार्टीचे आ.सुरेश धस यांच्यावतीने आयोजन केले जाते.याचेच औचित्य साधून शुक्रवारी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील अनेक नागरिकांनी यावेळी भोजनाचा आस्वाद घेतला.यावेळी ईदच्या पूर्वसंध्येला आ.सुरेश धस यांनी उपस्थित मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.यावेळी युवा नेते जयदत्त धस, गणेश शिंदे,नगरसेवक जिया बेग,आत्माराम फुंदे,नगरसेवक शरिफ शेख,इर्शान शेख,माजी उपसरपंच सय्यद शफी,हारूनशेठ शेख,समीर बेग,सय्यद तय्यब,युन्नूस शेख,डॉ.अजहर बेग,बबलुशेठ शेख,समीर सय्यद,राजू शिंदे ,अड.रिजवान सय्यद,सादिक कुरेशी,फैसल चाऊस, इंजि.रिजवान सय्यद,पत्रकार शरद रेडेकर,गणेश दळवी,शरद रेडेकर,सचिन रानडे,प्रविण पोकळे आदींसह हिंदू-मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.