क्लिक2आष्टी अपडेट-जिल्ह्यात सलग चार दिवसांपासून वादळी पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. अशात अंगावर शहारा आणणारा चंद्रपूर जिल्ह्यातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
वेकोली खाण परिसरात एका कर्मचाऱ्याचा अंगावर थेट वीज कोसळली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याच कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. बाबु धनकुमार महेंद्र सिंह असे मृतक कर्मचाऱ्याचे नाव आहे.मृतक बाबु धनकुमार महेंद्र सिंह हा वेकोलीच्या माजरी क्षेत्रातील नागलोन खाण परिसरात ओव्हर बर्डनची वाहतुक करणारा कर्मचारी होता.ही घटना मंगळवारी (दि.२५) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ओसी टु नागलोण खाण परिसरात घडली.या घटनेची माहिती मिळताच माजरी पोलिसांनी घटनास्थळ गाठले.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.