‘मला मुलगा नाही.तू आता माझ्या पतीसोबत लग्न कर प्राध्यापकाचा विद्यार्थींनीवर बलात्कार; प्राध्यापक पती-पत्नीवर पोलिसांत गुन्हा दाखल
औरंगाबाद विद्यापीठातील घटना
क्लिक2आष्टी अपटेड-वसतिगृहात राहणे सुरक्षित नसल्याचे सांगत एका विद्यार्थिनीला घरी पेइंग गेस्ट म्हणून राहण्यासाठी नेऊन तिच्यावर सहायक प्राध्यापकाने बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे.अशोक गुरप्पा बंडगर असे त्याचे नाव असून तो नाट्यशास्त्र विभागात सहायक प्राध्यापक आहे.या कृत्यात त्याच्या पत्नीचाही सहभाग असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.पती-पत्नीने संगनमताने मिळून माझ्यावर बेशुद्ध पडेपर्यंत अत्याचार केल्याचा धक्कादायक आरोप पीडित मुलीने मंगळवारी पोलिसांसमोर केला. मंगळवारी रात्री उशिरा बंडगर पती-पत्नीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी तीस वर्षीय पीडिता बाहेरील जिल्ह्यातून शहरात शिक्षणासाठी आली होती. शहरातील एका महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेत होती. यादरम्यान एका सर्व्हिस कोर्सनिमित्त तिची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागातील प्रा. बंडगरसोबत ओळख झाली. बाहेरील महाविद्यालयाची विद्यार्थिनी असली तरी बंडगरने मार्गदर्शन, सल्ला देण्याच्या बहाण्याने तिच्याशी संपर्क वाढवला.दि.२ डिसेंबर २०२१ रोजी ते पहिल्यांदा प्रत्यक्ष भेटले.त्यानंतर त्याने अचानक तिला,मी तयार करत असलेल्या चित्रपटात काम करण्यासाठी संधी देतो, असे म्हणत जवळीक निर्माण केली.स्टोरी बोर्डिंगचे काम देत तिला सतत प्रोत्साहन देणे सुरू केले.फेब्रुवारी २०२२ मध्ये पीडितेला बाहेर खोलीवर राहणे अशक्य झाल्याने तिने होस्टेलचा शोध सुरू केला.परंतु, तिने निवडलेले होस्टेल सुरू झाले नव्हते.त्याचदरम्यान तिची विद्यापीठ परिसरात बंडगरची भेट झाली.हा प्रकार कळल्यावर त्याने तिला वडिलकीच्या नात्याने घरी चल सांगून घरी नेले. त्यांच्या पत्नीनेही पीडितेला, “होस्टेल सुरक्षित नसतात, तू आम्हाला मुलीसारखीच आहेस,’असे म्हणत पेइंग गेस्ट म्हणून राहण्यासाठी आग्रह केला.मोठ्या विश्वासाने पीडिता पेइंग गेस्ट म्हणून बंडगर दांपत्याकडे राहायला लागली.जून २०२२ मध्ये बंडगरने तिच्या जवळ जाण्यास सुरुवात केली.वागणे विचित्र वाटल्याने पीडितेने त्याला अनेकदा दूर राहण्यास सांगितले. त्याच्या पत्नीने घराची सर्व आर्थिक जबाबादारी दिल्याने बंडगरने चोरीचा आळ घेऊन जुलैमध्ये तिच्यावर अत्याचार केला.त्यानंतर धमकावत वारंवार अत्याचार करत राहिला.हा प्रकार पीडितेने त्याच्या पत्नी पल्लवीला सांगितला.मात्र,’मला मुलगा नाही. तू आता माझ्या पतीसोबत लग्न कर. आम्हाला मुलगा हवा आहे,’ असे म्हणत धमकावले. त्यानंतर मात्र बंडगरची पत्नीदेखील पतीच्या कृत्याला समर्थन देत गेली.जानेवारी २०२३ मध्ये दोघांनी त्यांच्या खोलीत नेऊन मी बेशुद्ध पडेपर्यंत अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.त्यानंतर त्यांनी ढिबरगल्लीतील रुग्णालयात उपचार करून तिला घरी नेले.अखेर,मुलीची प्रकृती बिघडल्याचे कळल्यानंतर पीडितेचे वडील व बहिणीने तिला गावाकडे नेले.त्याप्रकरणी त्यांच्यावर तेथील स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.विद्यापीठ प्रशासनाने पीडितेला बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार करण्यास सांगितल्यानंतर मंगळवारी यात गुन्हा दाखल झाला.