व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

कटू वाटणारे सत्य…काही वर्षानंतर ही पिढीही नसेल…

ग्राऊंडरिपोर्ट-सचिन रानडे आष्टी

0

सचिन रानडे आष्टी-शिर्षक वाचून विचारात पडला असाल परंतु हे ही मान्य करण्यासाठी तेवढं मोठं मन करावं लागत.होय हे खरे आहे आणखी काही वर्ष जगणारी आत्ताची ही ज्येष्ठांची संस्कारित पिढी नक्कीच शेवटची असेल.कारण यांनी पारंपरिक जगणं अनुभवलय.संस्कारमय जीवन जगणे म्हणजे काय असतं हे त्यांनी जगलय.कारण हीचं ती पिढी आहे,ज्यांनी आई वडिलांना आपले देव आणि आदर्श मानलं.
ती हिचं पिढी आहे ज्यांनी परिस्थितीशी दोन हात करून एक आपले वेगळे विश्व निर्माण करून नाव मिळवलंय.ती हिच पिढी आहे जी रोज पहाटे लवकर उठायची सवय असणारी. भाव गीत भक्ती गीतांवर पहाट फुलवणारी.ती हिचं पिढी आहे जिने आई दारात भल्या पहाटे रांगोळी काढताना पाहिली.ती हिच पिढी आहे जिने अंगणातील तुळस पहिली.ती हिचं पिढी आहे जिने शुभंकरोतीने देवळातील दिवा तेवत ठेवला.ती हिचं पिढी आहे,पहाटे वासुदेव दारात आल्यावर त्याला आनंदाने घरातील व्यक्ती असेल ते दान करताना पाहणारी.ती हिचं पिढी आहे,सकाळच्या प्रहरी ज्ञानार्जन करणारी.ती हिच पिढी आहे जी गुरुजींना गुरू स्थान देऊन शिक्षक दिनी पाद्य पूजा करणारी आणि शाळेत गुरुजींनी डोळे वटारून बघितले तरी त्यांच्या प्रती आदर भाव व्यक्त करून खाली मान घालून चूक कबूल करणारी.ती हिचं पिढी आहे जी खेळात म्हणजेच कबड्डी,खोखो,विटी दांडू, लीगोर्च,धावाधाव,लपंडाव, यासह आदी मैदानी खेळ खेळत आपली शरीरयष्टी सुदृढ आणि मजबूत ठेवणारी.ती हिच पिढी आहे जी शेतात आंब्याच्या झाडावर,चिंचेच्या झाडावर,पेरूच्या झाडावर,जाऊन त्या अस्सल गावरान मेव्यावर ताव मारणारी.ती हिचं पिढी आहे जी आई,अत्या,काकू,मामी जात्यावर ओव्या म्हणून घराला घरपण देत असताना त्यांच्या गाण्याच्या तालावर ताल धरणारी.ती हिच पिढी आहे जी गोठ्यात बांधलेल्या गायीची धार काढताना हातात निरस दूध मिळावं म्हणून तिथे हातात तांब्या घेऊन उभं राहणारी.ती हिचं पिढी आहे जी रखरखत्या उन्हात शेतातील विहिरीत डुबक्या मारून पोहण्याचा आनंद लुटणारी.ती हिच पिढी आहे जी शाळेला सुट्टया लागताच मामाच्या गावाला जाण्यासाठी हट्ट करणारी.ती हिचं पिढी आहे,जिने अंगणात अस्सल वांग्याचं भरीत,ठेचा,बाजरीची भाकरी,जवसाची चटणी,दही,अशा गावरान मेजवानीचा सर्व कुटुंबांच्या उपस्थितीत आस्वाद घेतला.ती हिचं पिढी आहे जिने सगळ्या सणांचा आनंद घेतला.ती हिच पिढी आहे,जिने जगण्यातील खरा आनंद अनुभवला आणि ती हिच पिढी आहे जिने तो आनंद खऱ्या अर्थाने नैसर्गिकरीत्या जगला.अन्यथा आजची पिढी उशिरा झोपणे,मोबाईलमध्ये अर्ध्याहून अधिक दिवस घालवणे,कौटुंबिक सुसंवाद टाळणे,कुटुंबाला वेळ न देणे,सुख दुःख आता तर इव्हेंट मॅनेजमेंट सारखी झालीत.
सचिन रानडे-9860273300/8830396300

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.