व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

भरधाव वेगाने जाणारी शिवशाही बस पलटल्याने एक जण ठार तर बावीस जण जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात

0

क्लिक2आष्टी अपडेट-चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव वेगाने शिवशाही बस पलटल्याने एकजण ठार तर तब्बल बाबीस जण जखमी झाले असून,कर्नाळा खिंडीतील एका अवघड वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही बस दुभाजकाला धडकली.याबसमधून 40 जण प्रवास करत होते. मंगळवारी रात्री 3.30 च्या सुमारास अपघात झाल्याची माहिती आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,मुंबई गोवा महामार्गावरून पनवेलहून महाडकडे भरधाव वेगात शिवशाही बस निघाली होती.मात्र,कर्नाळा खिंडीत आल्यानंतर या बसला अपघात झाला.अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी जखमींना दोन रुग्णवाहिकांमधून पनवेल उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान,अपघातातील जखमी प्रवाशांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातून देण्यात आली.या अपघातात दिप्तेश मोरेश्वर टेमघर असे अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव आहे.तर जखमी प्रवाशांवर पनवेल उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या अपघातातील जखमींचे नावे पुढीलप्रमाणे विजय सपकाळ (४८ आमडोशी),कामोठे एमजीएम रुग्णालयात आंबावले (३३ साईनगर, पनवेल),तनुष्का बोंबले बोंबले (१२ कामोठे), पुर्विल शिंदे (१६ सुधागड),लता तळेगावकर (४२ रा. पारगाव, पनवेल), मितेश (२० नालासोपारा),विस्मय शिंदे सुधागड), मोहम्मद तौकिब रा. नालासोपारा), तेजश्री वाडवळ रा.माणगाव), राजश्री सपकाळ महाड),नामदेव पवार (४० रा. विलेपार्ले),अर्चना सुतार (३० रा. (७७ रा.गोरेगाव),रणधीर भोईर (४४ जांभूळटेप),सुजित (५१ महाड),मुक्तार इस्माईल कातील बोर्ले),भौमिक नामदेव पवार (३२ रा. महाड) पेण येथील हॉस्पिटल येथे कुंदा (५८ कशेडी)जखमी उपचार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.