व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

खोली भाड्याने देणे पडले महागात;मालकाला आला वाईट अनुभव

0

क्लिक2आष्टी अपडेट-अनेक कुटुंब आपले घर दाम्पत्यांनाच भाड्याने देणे पसंत करतात.एखाद्या बॅचलर मुलाने त्यांना घर मागितले तर ते त्यांना ठामपणे नकार देतात.या नकारामागील कारणे विविधांगी असतात.पण बहुतांश प्रकरणांत ‘मागचे अनुभव’च यासाठी कारणीभूत असतात.काहीजण शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना घर देतात.पण त्यासाठी ते त्यांच्यावर अनेक प्रकारच्या अटी लादतात.विशेषतः आपल्याला त्रास होईल,अशी कोणतीही गोष्ट करणार नाही,अशी अट ते घालतात.पण बंगळुरुतील एका व्यक्तीला यासंबंधी आलेला एक अनुभव फारच वाईट ठरला आहे.
पोडकास्ट होस्ट रवी हांडा यांनी यासंबंधीची काही फोटो शेअर केली आहेत.ती त्यांनी रेडिटवरून घेतली आहेत.त्यांच्या मते,हा फ्लॅट एका सुशिक्षित अविवाहित तरुणाला भाड्याने दिला होता.त्याने अशी दुर्दशा करून घर सोडले. तो व्यक्ती एका एमएनसीत काम करत होता.
फ्लॅटमध्ये सगळीकडे बिअरच्या अगणित रिकाम्या बाटल्या पडलेल्या होत्या. ठिकठिकाणी कचरा होता.स्लॅबच्या चारही कोपऱ्यात पडलेला कचरा व मोडलेल्या आलमारीमुळे स्वयंपाक घर अक्षरशः किळसवाणे झाले होते. फ्लॅटमधील कचऱ्याचा ढिग पाहून तो अनेक दिवसांपासून स्वच्छ केला नसावा असे वाटत होते.या फोटोंच्या कॅप्शनमध्ये रवी हांडा म्हणाले,”याच कारणामुळे घल मालक बॅचलर्स मुलांना घर किरायाने देत नाही.एका “मल्टीनॅशनल कंपनीत काम करणाऱ्या एका सुशिक्षित बॅचलरने बंगळुरुतील आपल्या घराची ही दशा केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.