व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

व्हॉईस ऑफ मीडिया आष्टी तालुकाध्यक्षपदी अनिरूध्द धर्माधिकारी तर उपाध्यक्षपदी नितीन कांबळे यांची निवड

प्रत्येक सदस्यांचा काढला १० लाखांचा विमा

0

क्लिक2आष्टी अपडेट-‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची आष्टी तालुका कार्यकारिणी बुधवारी जाहीर करण्यात आली. तालुकाध्यक्षपदी अनिरुद्ध धर्माधिकारी तर तालुका उपाध्यक्षपदी नितीन कांबळे,यशवंत हंबर्डे, कार्याध्यक्षपदी भाऊसाहेब गाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पदाधिकारी निवडीनंतर संघटनेतील शहरी व ग्रामीण भागातील 25 पत्रकारांच्या पाॅलिसी काढून 10 लाखांच्या अपघात विम्याचे संरक्षण देण्यात आले.
राज्य कार्यवाहक तथा बीड जिल्हाध्यक्ष बालाजी मारगुडे, राज्य उपाध्यक्ष संजय मालाणी, जिल्हा कार्याध्यक्ष दिनेश लिंबेकर, मराठवाडा कार्याध्यक्ष जालिंदर धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरूवारी (दि.27) ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची आष्टी तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. व्हॉईस ऑफ मीडियाचे मराठवाडा उपाध्यक्ष शुभम खाडे, बीड जिल्हा कार्याध्यक्ष उदय नागरगोजे, बीड जिल्हा कोषाध्यक्ष अनंत वैद्य, पत्रकार अविशांत कुमकर यांच्या उपस्थितीत आज (ता.27) येथील शासकीय विश्रामगृहात नवनियुक्त पदाधिका-यांचा सत्कार करून तालुका कार्यकारिणीशी संवादाचा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमानंतर संघटनेशी संलग्न असलेल्या 25 पत्रकारांना 10 लाखांच्या अपघात विमा पाॅलिसी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या संघटनेने स्वखर्चातून काढण्यात आल्या. संघटनेच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल नवनियुक्त तालुकाध्यक्ष अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी आष्टी तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने आभार मानले.नवनियुक्त तालुका कार्यकारिणीत सरचिटणीस संजय खंडागळे,सहसरचिटणीस कासम शेख,कोषाध्यक्ष अंकुश तळेकर, कार्यवाहक दिगंबर बोडखे, संघटक मुजाहिद सय्यद,प्रसिद्धी प्रमुख अशोक तळेकर यांचा समावेश करण्यात आला आहे.या वेळी कृष्णा पोकळे,गोपाल वर्मा,विकास म्हस्के,सुरेश कांबळे,रहेमान सय्यद, अतुल जवणे,अनिल मोरे,मनोज पोकळे आदी उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.