वादळी वाऱ्यात झोळी उडाल्याने दीड वर्षाच्या बाळाचा मृत्यू
क्लिक2आष्टी अपडेट-वादळी वाऱ्यात झोळी उडाल्याने दीड वर्षाच्या बाळाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पंढरपुरातील सांगोल्यात जवळा येथील लेंडी ओढ्यात ही घटना घडली.कस्तुरा साधू जाधव असे या मृत्यू झालेल्या बाळाचे नाव आहे.
आज दि.२८ रोजी अचानक आलेल्या वावटळीत पालासकट झोळी उडून झोळीत झोपलेल्या बाळावर पडली. डोक्याला जबर मार लागल्याने बाळाचा जागीच मृत्यू झाला.मृत बाळाच्या आईने व कुटुंबीयांनी घटनेनंतर टाहो फोडल्याने उपस्थितांनाही हळहळ व्यक्त केली.